एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2023 : मालिशमुळे वारकरी सुखावले... दिवेघाटात चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एका क्षणात हसू

पुणे ते सासवड हा लांबचा टप्पा पार करताना अवघड अशी दिवेघाटाची वाट चढून आल्यावर दमलेल्या पायांना योग साधकांकडून तिळाच्या तेलाने मसाज केली .

Ashadhi Wari 2023 : दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवते. पुणे ते सासवड हा लांबचा टप्पा पार करताना अवघड अशी दिवेघाटाची वाट चढून आल्यावर दमलेल्या पायांना योग साधकांकडून तिळाच्या तेलाने मसाज केली. या आगळ्यावेगळ्या मसाज सेवेने वारकरी सुखावले आणि उत्साहाने पुढे मार्गस्थ झाले. वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठुरायाची सेवा म्हणत अनेक लोक वारकऱ्यांची मसाज करुन देण्यासाठी पुढे येतात. 

योग विद्याधाम पिंपरी चिंचवडतर्फे शास्त्रशुद्ध पद्धतीने योगसाधक मसाज करुन देतात. एकावेळी साधारण 50 महिला आणि  50 पुरुष वारकऱ्यांचा मसाज होतो. यंदा या वारीत सहा ते सात हजार वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. योग विद्याधाम संस्थेचे प्रमुख योगगुरू प्रमोद निफाडकर आणि निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुरेश केकाने, ऐश्वर्या जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारकरी मसाज सेवा गेल्या 9 वर्षापासून सुरू आहे.

शेकडो किलोमीटरची पायी वारी करताना पाय थकतात. अशावेळी वारकऱ्यांच्या पायांना मसाज करून देण्याची संकल्पना आमच्या कार्यकर्त्यांनी मांडली आणि हा उपक्रम सुरु झाला. पुणे-सासवड हा लांबचा पल्ला; त्यातही दिवेघाटाची अवघड वाट चालून वर आल्यावर मन आनंदी असले, तरी पायांना थकवा येतो. मसाज करून पाय मोकळे करावेत आणि मानसोबत पायही त्याच आनंदाने पुढे चालावे, या उद्देशाने ही सेवा देत आहोत. पांडुरंगाची चरणसेवा केल्याची अनुभूती आम्हाला मिळते, असं प्रमोद निफाडकर यांनी सांगितलं. शंभर ते दीडशे योगसाधक ही सेवा देतात. वारकऱ्यांना यातून सुखद आनंद मिळतो. वारीत पाण्यासह भोजन, औषधे, खाद्यपदार्थ आणि अन्य गोष्टी मिळतात. पण अशी अनोखी सेवा दिवेघाटातून वर आल्यावर मिळते त्यामुळे वारकऱ्यांचा थकवा नाहिसा होतो आणि वारकरी पंढरीच्या वाटेने मार्गस्थ होण्यासाठी तयार होता. 

वारकऱ्यांच्या पायांना मसाज करून सेवेचा निखळ आनंद आम्ही घेतो. हजारो माऊलींच्या पायांना मसाज करण्याचा हा आनंद आम्हाला शेवटपर्यंत घेता यावा, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो असं मसाज करणाऱ्या महिला सांगतात. दिवे घाट हा सगळ्यात महत्वाचा टप्पा मानला जातो. आज वारकरी तब्बल 35 किलोमीटरचा प्रवास पार करतात. निर्सगातून वारी जाताना विहंगम दृष्य तयार झालं होतं. 

हे ही वाचा-

Ashadhi wari 2023 : कडकडीत ऊन, हाती टाळ, विठुनामाचा गजर अन् लाखो वारकरी; दिवे घाटाची अवघड वाट माऊलींनी केली पार

महत्त्वाच्या बातम्या

Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका! तुळशी मातेला काय अर्पण करावे? काय टाळावे? धार्मिक मान्यता, परंपरा...
तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका! तुळशी मातेला काय अर्पण करावे? काय टाळावे? धार्मिक मान्यता, परंपरा...
Kartiki Ekadashi 2026 Wishes: कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! चातुर्मासाची सांगता..प्रियजनांना पाठवा 'हे' सुंदर शुभेच्छा संदेश, विठुराया चरणी प्रार्थना..
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! चातुर्मासाची सांगता..प्रियजनांना पाठवा 'हे' सुंदर शुभेच्छा संदेश, विठुराया चरणी प्रार्थना..
Tulsi Vivah 2026: आजपासून तुलसीविवाहारंभ..विवाहाचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! तुलसी विवाह शेवटची तारीख कधी? धार्मिक महत्त्व, परंपरा, मुहूर्त...
आजपासून तुलसीविवाहारंभ..विवाहाचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! तुळसी विवाह शेवटची तारीख कधी? धार्मिक महत्त्व, परंपरा, मुहूर्त...
Tulsi Vivah 2026 Wishes: आजपासून तुलसी विवाहारंभ! प्रियजनांना पाठवा 10 सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांमध्ये येईल गोडवा..
आजपासून तुलसी विवाहारंभ! प्रियजनांना पाठवा 10 सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांमध्ये येईल गोडवा..

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Embed widget