एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ashadhi wari 2023 : कडकडीत ऊन, हाती टाळ, विठुनामाचा गजर अन् लाखो वारकरी; दिवे घाटाची अवघड वाट माऊलींनी केली पार

अवघा रंग एक झाला, जय जय राम कृष्ण हरी या ओळी गात आणि टाळ मृदुंगावर ठेका धरत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने वारीचा सगळ्या महत्वाचा आणि कठीण टप्पा पार केला.

Ashadhi wari 2023 : अवघा रंग एक झाला, जय जय राम कृष्ण हरी (Ashadhi wari 2023) या ओळी गात आणि टाळ मृदुंगावर ठेका धरत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने वारीचा सगळ्या महत्वाचा आणि कठीण टप्पा पार केला. हे वारकऱ्यांनी भर ऊन्हात विठुनामाचा गजर करत दिवे घाट पार केला आहे. लाखो वारकऱ्यांमुळे दिवेघाटात विंहंगम दृष्य़ पाहायला मिळालं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी मुक्कामी आहे. 

अभंगाच्या ओळी अन् दिवे घाटाची वाट

वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा, आणिक मी देवा काही नेणे, गाये नाचे उडे आपुलीया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, असे अभंग म्हणत टाळ मृदंगाच्या तालावर माऊली.. माऊली.. हा जयघोष करत पालखी सोहळा पुढे सरकत होता. यावेळी सगळी सुख दु:ख विसरुन वारकरी तल्लीन झाले होते. दिवे घाटातील हिरवाईन वारकऱ्यांना चालण्याची शक्ती मिळत होती. ही हिरवाई जणू काही पालखी सोहळ्यासाठी नटली होती, अशीच अनुभूती येत होती. लाखो वैष्णवजनांसह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात पोहोचली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही चढण पार करून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. 

सर्वात कठीण टप्पा केला पार...

पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो. कारण या पालखी मार्गातील एकूण अंतर हे सगळ्यात जास्त चालून जाण्याचा अंतर आहे. पुणे ते सासवड मार्ग दरम्यान दिवे घाटाचा अवघड घाट चालून वारकरी सोपानकाकाच्या सासवडमध्ये मुक्कामी थांबतात. पुण्यातून सकाळी सहा वाजता माऊलींची पालखी प्रस्थान ठेवलं. त्यानंतर सकाळी आठ वाजता शिंदे छत्रीला आरती झाली. साधारणतः दहा ते साडे दहाच्या दरम्यान पालखी हडपसरला पोहोचली. हडपसरपर्यंत पुणेकर माऊलींच्या पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती. यावेळी वारकऱ्यांच्या जेवणासाठी मेजवाणी करण्यात आली होती. 

आता दोन्ही पालख्यांची वाखरीमध्ये भेट

 तुकोबांच्या पालखीने लोणीकाळभोर साठी प्रस्थान ठेवलं होतं. आता पुण्यातून बाहेर पडलेल्या माऊली आणि तुकोबांच्या पालख्या शेवटी वाखरीमध्ये एकत्र भेटतात. त्यामुळे विठ्ठल भेटीसाठी आसुसलेले हे वारकरी पुण्यातून वेगळे होतात. माऊली महाराजांची पालखी ही सासवड जेजुरीमार्गे पंढरपूरकडे कूच करते  तर तुकोबांची पालखी लोणी काळभोर बारामती मार्गे पंढरपूरला पोहचणार आहे.

संबंधित बातमी-

Ashadhi wari 2023 : वारकऱ्यांसोबत गिरीश महाजन रमले वारीत, टाळ हाती घेत धरला ठेका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Embed widget