(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Relationship : फक्त तुम्हीच नाही! ब्रेकअपनंतर अनेकांच्या शरीरात होतात 'असे' बदल, जाणून आश्चर्यचकित व्हाल
Relationship : ब्रेकअपनंतर अनेकांच्या शरीरात होतात असे काही बदल होतात, जे जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल...
Relationship : ते म्हणतात ना, प्रेम करणं खूप सोप्प असतं. परंतु ते शेवटपर्यंत निभावणं हे तितकच कठीण असतं. जो कोणी प्रेमाच्या नात्यात असतो, त्याला अनेक मानसिक ते शारिरीक बदलांतून जावे लागते. कारण या काळात आपल्या शरीरात अनेक बदल होत होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कोणाचा ब्रेकअप होतो. तेव्हा प्रेमसंबंध तुटणे माणसाला आतून हादरवून टाकते. तज्ज्ञ सांगतात की, ब्रेकअपचा प्रभाव फक्त हृदय आणि मनावरच मर्यादित नसतो, तर त्याचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. ब्रेकअपनंतर अनेकांच्या शरीरात होतात असे काही बदल होतात, जे जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल...
नातं तुटल्यावर माणसाला दु:खाचा सामना करावा लागतो.
नातेसंबंधात मन जितके निरोगी राहते, तितकेच नाते तुटल्यावर माणसाला दु:खाचा सामना करावा लागतो. हा असा टप्पा आहे, जेव्हा लोकांचा मेंदू काही दिवस काम करणं थांबवतो, कारण अशा लोकांना त्यांचे भविष्य पूर्णपणे असुरक्षित दिसते. ब्रेकअप नंतर, अनेक जण इतके दु:खी होतात की, ते स्वत:च्या आनंदासाठी काहीही विचार करू शकत नाही. तज्ज्ञ सांगतात, या स्थितीत, शरीर तणावाचे म्हणजेच स्ट्रेस हार्मोन्सचे उत्पादन वाढवते, ज्यानंतर आपल्याला शरीरात काही विशेष बदल देखील दिसतात. आज आम्ही तुम्हाला प्रेमसंबंध तुटल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात कोणते बदल दिसून येतात हे जाणून घेऊ.
झोपेचा त्रास
ब्रेकअप झाल्यानंतर काही दिवस शांत झोप घेणे अनेकांना शक्य नसते. या दरम्यान, झोपेचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत होते आणि हार्मोन्सच्या असंतुलनामुळे लोक तणावाचे देखील बळी होतात. याचप्रमाणे या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, हे महत्वाचे आहे की तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी गरम शॉवर घ्या आणि नंतर हलके संगीत ऐकत झोपण्याचा प्रयत्न करा.
उच्च रक्तदाब समस्या
ब्रेकअपमधून जात असलेले शरीर अनेकदा उच्च रक्तदाबाच्या म्हणजेच हाय बीपीच्या समस्येने ग्रस्त असते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका देखील अनेक लोकांमध्ये वाढतो, यावर मात करण्यासाठी, हे महत्वाचे आहे की एकट्याने जास्त विचार करण्याऐवजी, तुम्ही तुमचे मन हलके करण्याचा प्रयत्न करा.
त्वचेशी संबंधित समस्या
ब्रेकअपनंतर दुःखाने ग्रासलेल्या लोकांमध्ये पिंपल्सची समस्याही वाढू लागते. कारण, बरेच लोक आपल्या त्वचेची काळजी घेणे विसरतात आणि स्वत: चा विचार करण्याऐवजी ते आपल्या जोडीदाराच्या विचारात रमून जातात. या समस्येवर मात करण्यासाठी, आपण आपल्या गरजांकडे दुर्लक्ष करणे टाळणे आवश्यक आहे आणि त्वचेची काळजी घेण्यास विसरू नका.
खाण्याची लालसा
ब्रेकअपनंतर, लोक सहसा मित्रांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. एकटेपणा जाणवल्याने काहीवेळा विविध प्रकारची लालसा निर्माण होते, जी आरोग्यासाठी हानिकारक ठरते. या काळात, तुम्हाला खूप गोड किंवा मसालेदार अन्न खावेसे वाटते, जे वजन वाढण्यासाठी पुरेसे आहे. अशात, स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा तुम्हाला इच्छा असेल तेव्हा निरोगी पर्यायांचा अवलंब करा.
कमकुवत प्रतिकारशक्ती
ब्रेकअपनंतर तणावामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते. या टप्प्यात तुम्हाला आजारी किंवा थकवा जाणवत असेल, तर तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा. तसेच, स्वतःचे मनोरंजन करण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा>>>
Relationship Tips : आजकाल ब्रेकअपचा ट्रेंड वाढलाय! हसतं-खेळतं नातं तोडू शकतात तुमच्या 'या' चुका, ब्रेकअपची कारणं समजून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )