Relationship Tips : छोट्या-छोट्या गोष्टीत जोडीदाराशी होते तू-तू मैं-मैं? नात्यात गोडवा वाढविण्यासाठी 'या' टिप्स एकदा पाहाच
Relationship Tips : एका अभ्यासानुसार, जोडप्यांमधील छोटी भांडणं हे नातं मजबूत करण्याचं काम करतात, परंतु याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जाणूनबुजून भांडण सुरू कराल...
Relationship Tips : नवरा-बायको असो... किंवा प्रियकर-प्रेयसी...प्रेमाचं नातं म्हटलं की छोटे-मोठे वाद, भांडणं आलीच..कोणत्याही नात्यात छोटी-छोटी भांडणं होणं ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु जर ते दिवसेंदिवस वाढत असतील, तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही काही रिलेशनशिप टिप्स शेअर करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून जोडप्यांना जवळ आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील. यामुळे वाद तर थांबतीलच पण प्रेमही वाढेल. जाणून घेऊया प्रेमाच्या नात्यात गोडवा वाढविण्यासाठी 5 खास टिप्स..
...अन् समोरच्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यभर गमावून बसता
नात्यात भांडणं सर्रास होतात. कधी प्रेयसी तिच्या बॉयफ्रेंडवर रागावते तर कधी मुलगा प्रेयसीवर रागावतो. एका अभ्यासानुसार, जोडप्यांमधील लहान भांडणं हे नातं मजबूत करण्याचे काम करतात, परंतु याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जाणूनबुजून भांडण सुरू करता. अनेकवेळा एखादी छोटीशी चूक किंवा रागाच्या भरात एकमेकांशी बोललेले शब्द मोठे वळण घेतात आणि समोरच्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यभर गमावून बसता. म्हणूनच या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही रिलेशनशिप टिप्स घेऊन आलो आहोत, ज्या रिलेशनशिप मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
जोडीदाराला स्पेशल वाटण्यासाठी...
जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरला नेहमी स्पेशल वाटायला हवे. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असता तेव्हा त्यांना असे वाटू द्या की तुम्ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात.
छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या..
कधीकधी तुम्ही स्वतःमध्ये इतके व्यस्त होतात की तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू लागतो. तर असे होऊ नये. जोडीदाराच्या छोट्या-मोठ्या गोष्टींची नेहमी काळजी घ्यावी, यामुळे नाते मजबूत होते.
संवादातून तोडगा निघेल
जर तुमची चूक असेल तर भांडण संपल्यानंतर तुमच्या जोडीदाराशी बोला. त्यांच्यासाठी वेळ काढा. सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जा. छान गोष्टी बोला. यामुळे समोरची व्यक्ती तुमच्यावर इम्प्रेस होईल.
राग बाजूला ठेवा
कधीकधी तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल एखादी गोष्ट वाईट वाटू शकते. पण रागाच्या भरात अपशब्द किंवा वाईट उत्तर देऊ नका. कारण यामुळे नातेसंबंध बिघडतात. जर तुमच्या जोडीदाराने तुम्हाला न आवडणाऱ्या काही गोष्टी सांगितल्या तर त्याकडे दुर्लक्ष करा जेणेकरून हे प्रकरण भांडणात वाढू नये.
तुमच्या जबाबदाऱ्यांपासून पळू नका
काही लोकांना त्यांच्या वाईट परिस्थितीत झालेल्या चुकांसाठी इतरांना दोष देण्याची सवय असते. रिलेशनशिपमध्ये, जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला दोष देऊ लागतो तेव्हा नातं बिघडायला लागतं. एकदा का तुमचा पार्टनर या गोष्टीला कंटाळला की तो नातं तोडतो.
हेही वाचा>>>
Relationship : फक्त तुम्हीच नाही! ब्रेकअपनंतर अनेकांच्या शरीरात होतात 'असे' बदल, जाणून आश्चर्यचकित व्हाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )