What is Obesity : लठ्ठपणाने त्रस्त आहात? वजन कमी करायचंय? ‘या’ सोप्या टिप्स नक्की ट्राय करा!
Obesity | Over Weight Issue : काही लोकांचे वजन सतत वाढत असते आणि मग वजन कमी करण्यासाठी आहारात काय बदल करावेत, हे त्यांना कळत नाही. यामुळे बरेच लोक खूप तणावात देखील असतात.
Obesity | Over Weight Issue : लठ्ठपणा (Obesity), वाढतं वजन ही आजच्या काळात जगातील सर्वात मोठी आरोग्य समस्या बनली आहे. लठ्ठपणामुळे अनेक वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळते. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांचा समावेश असतोच, मात्र सामान्य लोकांपेक्षा लठ्ठ असलेल्या लोकांना हृदयरोग आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका जास्त असतो.
काही लोकांचे वजन सतत वाढत असते आणि मग वजन कमी करण्यासाठी आहारात काय बदल करावेत, हे त्यांना कळत नाही. यामुळे बरेच लोक खूप तणावात देखील असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही तुमचे वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. काही सोप्या उपायांचा अवलंब करून आणि चांगला आहार घेतल्यास तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकाल.
Obesity | Over Weight Issue : वजन कमी करण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा
* सकाळी उठून रिकाम्या पोटी एक ते दोन ग्लास पाणी प्या, यामुळे चयापचय वाढेल आणि तुमच्या शरीरातील चरबी कमी होईल.
* साखरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा, कारण त्यामुळे वजन झपाट्याने वाढते.
* जेण्यापूर्वी 15 मिनिटे ते अर्धा तास अगोदर पाणी प्या. यामुळे तुम्ही भुकेपेक्षा जास्त अन्न खाऊ शकणार नाहीत.
* तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
* अन्न हळूहळू खाण्याची सवय लावा, यामुळे अन्नाचे पचन चांगले होईल.
* दुधाच्या चहाऐवजी आल्याचा चहा किंवा ग्रीन टी पिण्याची सवय लावा, यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
* आईस्क्रीम आणि कोल्डड्रिंकचे सेवन कटाक्षाने टाळा.
Obesity | Over Weight Issue : 'या' गोष्टी लक्षात ठेवणे देखील आवश्यक
वजन कमी करण्यासाठी दररोज किमान अर्धा तास जलदगतीने चालणे आवश्यक आहे. जर, तुम्हाला जास्त चालता येत नसेल, तर योगा किंवा इतर व्यायाम करा. तुम्ही जितका जास्त घाम गाळाल तितक्या वेगाने तुमचे वजन कमी होईल. लिफ्टऐवजी पायऱ्या वापरण्याचा प्रयत्न करा.
Obesity | Over Weight Issue Tips to Follow : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हेही वाचा :
- Health Tips : अॅसिडिटीवर घरगुती उपाय आहे आवळ्याची 'ही' रेसिपी, नियमित सेवनाने पचनक्रिया राहील चांगली
- Health Tips : आहारात मिठाचं प्रमाण कमी करायचंय? मग 'या' टिप्स खास तुमच्यासाठी...
- वेलची खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )