New Year 2024 : पार्टी करा, एन्जॉय करा! पण नवीन वर्षासाठी तुम्ही घरात किती दारू ठेवू शकता? हे नियम आधी जाणून घ्या!
नवीन वर्षाच्या पार्टीसाठी दारु घेऊन घरात ठेवण्याचा प्लॅन करत असाल. तर थांबा आणि आपल्या घरात आपण किती दारु ठेवू शकतो. त्याचे नियम काय आहेत हे नक्की जाणून घ्या....
New Year 2024: : 2023 संपणार असून नवीन वर्ष, म्हणजेच 2024 चे स्वागत करण्यासाठी लोक सज्ज झाले आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने भरपूर सेलिब्रेशन केलं जातं. नववर्ष साजरं करण्यासाठी लोक जोरदार पार्टी करतात. या पार्ट्यांमध्ये अनेकजण ड्रिंक्सदेखील करत असतात. ड्रिंक्स शिवाय अनेकांची पार्टी पूर्ण होत नाही. ड्रिक्स करणं आरोग्यासाठी धोकादायक आहे, मात्र तरीही अनेक लोक पार्टी म्हटलं की ड्रिंक्स करतातच. अनेकांना बाहेर पार्टी करणं पसंत असतं, तर अनेकजण घरातच पार्टी करण्यात आणि आपल्या लोकांसोबत वेळ घालवण्याला पसंती देतात. मात्र जर यावर्षी तुम्हाला बाहेर न जाता घरातच पार्टी करायची असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर नवीन वर्षाच्या पार्टीसाठी दारु घेऊन घरात पार्टीचा प्लॅन करत असाल तर थांबा आणि आपल्या घरात आपण किती दारु ठेवू शकतो. त्याचे नियम काय आहेत हे नक्की जाणून घ्या....
दिल्लीत घरात किती दारू साठवण्याची परवानगी?
दिल्ली उच्च न्यायालयाच्या नियमांनुसारच तुम्हाला घरात दारू साठवण्याची परवानगी आहे. दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर, जर तुमचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही 9 लिटर व्हिस्की, रम किंवा वोडका घरी साठवून ठेवू शकता. याशिवाय दिल्लीकर आपल्या घरात 18 लिटर बिअर किंवा वाईन देखील साठवू शकतात. नवीन वर्षात तुम्हाला किती मोठी पार्टी करायची आहे, याचा अंदाज घेऊन दारु खरेदी करा.
पंजाब आणि हरयाणामध्ये तुम्ही किती दारू साठवू शकता ?
पंजाबमध्येही नववर्षाचा भरपूर आनंद लुटला जातो. जर तुम्ही पंजाबमध्ये न्यू इयर पार्टी करत असाल तर, तुम्ही घरी देशी किंवा विदेशी दारूच्या दोनच बाटल्या ठेवू शकता. हरियाणामध्ये देशी दारूच्या सहा बाटल्या आणि विदेशी दारूच्या 18 बाटल्या घरी ठेवता येतात. यापेक्षा जास्त मद्यसाठा करायचा असेल तर, महिन्याला 200 रुपये शुल्क भरून परवाना घ्यावा लागणार आहे.
गोव्यातील नियम काय आहेत?
गोव्यासारख्या राज्यात जिथे जोरदार पार्ट्या होतात, तिथे तुम्ही बिअरच्या 18 बाटल्या घरी साठवून ठेवू शकता. याशिवाय देशी दारूच्या 24 बाटल्या ठेवता येतील. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर, इथल्या घरात दारूच्या 6 बाटल्या ठेवता येतात. राजस्थानसारख्या राज्यात आयएमएफएलच्या 18 बाटल्या घरी ठेवता येतात.
महाराष्ट्रात काय आहे नियम?
महाराष्ट्रात एका व्यक्तीला एका वेळी 12 बाटल्या ठेवता येतात. 8 ते 10 लोक असलेल्या छोट्या फॅमिली पार्टीसाठी परमिट न घेणे ठीक आहे, परंतु बाजूच्यांची तक्रार नसावी. इमारतीचा कंपाऊंड, टेरेस, लॉन्स या ठिकाणी पार्टी केल्यास परवाना आवश्यक असतो.
इतर महत्वाची बातमी-
Affordable Alcohol: गोव्यातच नाही, तर देशातील 'या' राज्यांमध्येही मिळते स्वस्त दारु; पाहा...