Health Tips : 'या' 7 परिस्थितीत कधीही वजन करू नका, नेहमी चुकीची माहिती मिळेल; वाचा सविस्तर
Health Tips : वजन मोजण्यासाठी योग्य वेळ निवडणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा वजन मोजल्यानंतर आपल्याला नेहमीच चुकीची माहिती मिळेल.
Weight Measurement : सध्याच्या काळात सगळेजण फिटनेसकडे फार लक्ष देऊन आहेत. यासाठी प्रत्येकजण फीट राहण्याचा आणि वजन (Weight) कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी ते वेळोवेळी आपलं वजन मोजतात. अशा स्थितीत वजनातील कोणत्याही लहान बदलामुळे लोक अस्वस्थ होतात. हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरते. वजन मोजण्यासाठी योग्य वेळेकडे लक्ष देणं खूप महत्वाचे आहे. काही परिस्थितीत जेव्हा तुम्ही वजन मोजता तेव्हा तुम्हाला चुकीची माहिती मिळू शकते.
जाणून घेऊया वजन कधी मोजू नये
जेवणानंतर ताबडतोब वजन करू नये : जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा तुमचं वजन वाढू शकते. कारण तुम्ही फक्त जास्त पाणी आणि अन्नाचं सेवन करतात.
जास्त पाणी प्यायल्यावर लगेच : जर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी प्यायलात तर तुमचे वजन लगेच वाढलेले दिसते, त्यामुळे यावेळी वजन मोजू नका.
व्यायामानंतर लगेच : व्यायाम करताना आपल्याला घाम येतो, त्यामुळे वजन कमी होऊ शकते. परंतु, ही घट तात्पुरती आहे आणि वास्तविक शरीराच्या वजनात कोणताही बदल होत नाही.
मासिक पाळीच्या दरम्यान महिलांनी वजन मोजू नये : कारण हार्मोनल बदलांमुळे वजन वाढू शकते. मासिक पाळीच्या दरम्यान श्रोणित अनेक बदल होत असतात. ज्यामुळे त्या भागात तात्पुरता दबाव आणि अस्वस्थता वाढू शकते. ज्यामुळे तुमचे वजन कमी किंवा जास्त असू शकते.
आजारा दरम्यान वजन मोजणे देखील योग्य नाही : कारण आजारात आपलं शरीर आधीच थकलेलं असतं. काही खावंसं वाटत नाही. त्यामुळे या दरम्यान देखील वजन करू नये.
दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी : तुमचे वजन दिवसाच्या इतर वेळेपेक्षा सकाळी कमी असते. त्यामुळे जर तुम्ही तुमचे वजन नियमितपणे मोजत असाल तर ते तुम्ही ठराविक वेळेत केले तर चांगले आहे.
पुरेशी झोप न झाल्यास वजन करू नये : जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा हार्मोन्समध्ये व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे भूक वाढते किंवा चयापचय मंदावतो, अशा परिस्थितीत तुमचे वजन मोजल्यानंतर कमी किंवा जास्त असू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :