Navratri Recipe : टेस्टही आणि चवीला बेस्ट... उपवासाचा खमंग ढोकळा बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...
Upvasacha Dhokla : उपवासाचा खमंग ढोकळा बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...
Upvasacha Dhokla Recipe : गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाची सर्वजण वाट पाहत आहेत. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रोत्सवात अनेक मंडळी उपवास करतात. या दिवसांत हलका-फुलका आहार घेणं गरजेचं आहे. तर आज जाणून घ्या उपवासाचा खमंग ढोकळा (Upvasacha Dhokla Recipe) बनवण्याची रेसिपी...
'उपवासाचा खमंग ढोकळा' बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
- वरीचे पीठ - 1 कप
- साबुदाणा - 1.4 कप पूड
- दही - 1.2 कप
- पाणी - 1.2 कप
- बेकिंग सोडा - 1.2 चमचा
- सैंधव मीठ - 1 चमचा
- जिरे - 1 चमचा
- लिंबाचा रस - 1.2 चमचा
- कोथिंबीरीची पाने - 1 चमचा
- हिरव्या मिरच्या - आवश्यकतेनुसार
'उपवासाचा खमंग ढोकळा' बनवण्याची कृती -
- एका वाटीत 1 कप वरीच्या तांदळाचे पाठी, साबुदाणा पावडर, दही, चवीनुसार सैंधव मीठ, आणि आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या चिरुन त्यात पाणी घालून ते छान मिक्स करा.
- तयार झालेलं मिश्रण 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
- एका प्लेटला तेल लावून तयार झालेलं मिश्रण त्यामध्ये ओता.
- मिश्रण सर्वत्र एकसमान पसरुन घ्या.
- आता एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी उकळवून घ्या.
- आता त्या पॅनवर ढोकळ्याचं मिश्रण ओतलेली डिश ठेवा आणि पॅनवर झाकण ठेवा.
- हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे वाफेवर शिजत ठेवा.
- त्याचवेळी बाजूला दुसरा एक पॅन घेऊन त्यामध्ये तेल गरम करा.
- गरम तेलामध्ये जीरे आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून चांगलं परतून घ्या.
- ढोकळ्याला आपल्या आवडीच्या आकारात कट करा आणि हिरव्या मिरच्या आणि जिऱ्याच्या फोडणीने गार्निशिंग करा.
- तयार झालेल्या खमंग ढोकळ्याचा चटणीसोबत आस्वाद घ्या.
उपवास करताना काय काळजी घ्यावी?
- नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी कामाशिवाय प्रवास करणे टाळावे.
- आजारी असल्यास उपवास करणे टाळावे.
- गरोदर महिलेने वैद्यकीय सल्ला घेऊन उपवासाबाबतचा निर्णय घ्यावा.
- उपवासादरम्यान फळे आणि दुधाचं सेवन करावं.
- आपल्या क्षमतेचा विचार करुन उपवास करण्याचा निर्णय घ्यावा.
- उपवास करताना योग्य आहार घेणं गरजेचं आहे.
संबंधित बातम्या