Hernia Surgery: हर्निया शस्त्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्र ठरतंय प्रभावी
Hernia Surgery: हर्निया या रोगात काही प्रकार आढळतात. तसंच विशिष्ट प्रकारचा हर्निया हा विशिष्ट वयोगटातील व्यक्तींना होतो. जाणून घेऊया, हर्नियाचे प्रकार.

>> डॉ. अपर्णा गोविल भास्कर,बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन,मेटाहील - लॅपरोस्कोपी आणि बॅरिएट्रिक सर्जरी सेंटर(मुंबई) सैफी, अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्स(मुंबई)
Hernia Surgery: हर्निया म्हणजे, आपल्या शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येतो. हर्निया शस्त्रक्रिया ही हर्नियाच्या असामान्यता दुरुस्त करण्यासाठी सर्वात महत्वाच्या उपचारांपैकी एक आहे. शस्त्रक्रिया प्रक्रियेतील अलीकडील विकासामुळे आधुनिक हर्निया दुरुस्ती रुग्णांचे चांगले परिणाम, जलद पुनर्प्राप्ती आणि गुंतागुंतीचं प्रमाण कमी करतं.
हर्नियाचे प्रकार
हर्निया या रोगात काही प्रकार आढळतात. तसंच विशिष्ट प्रकारचा हर्निया हा विशिष्ट वयोगटातील व्यक्तींना होतो. जाणून घेऊया, हर्नियाचे प्रकार. तीव्रता आणि परिणामानुसार हर्नियाचं अनेक प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. पोटाच्या खालच्या भागात हर्निया जास्त प्रमाणात आढळून येतात. उदा. जांघेत , मांडीच्या अगदी वरच्या भागात आणि बेंबीत, क्वचित फुप्फुस, मेंदू, स्नायू किंवा चरबी यांचा हर्निया होऊ शकतो.
शस्त्रक्रिया कधी करण्याची शिफारस केली जाते?
जर तुमचा हर्निया वाढत असेल किंवा त्यामुळे दुखत असल्यास त्यावरून त्याच्यावर करण्यात येणारे उपाय ठरवले जातात. हर्नियाची सर्जरी करणं, हा सर्वोत्तम उपाय आहे. हर्नियाची ओपन किंवा लेप्रोस्कोपिक सर्जरी करून तो बरा केला जातो. जेव्हा हर्निया मोठा होत असतो किंवा अस्वस्थता आणि वेदना होत असतात, तेव्हा लवकर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो.
हर्निया दुरुस्तीसाठी प्रगत तंत्र
आधुनिक शस्त्रक्रिया पद्धतींनी हर्निया उपचारांच्या परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. सर्वात अलीकडील प्रगती अशी आहेत :
लेप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये एका छोट्या कॅमेराचा वापर करून आणि सर्जरीची छोटी उपकरणं वापर करण्यासाठी काही छोट्या चिरा देऊन हर्नियाची सर्जरी केली जाते. लेप्रोस्कोपिक सर्जरी केल्यामुळे हर्नियाच्या आसपासच्या उतींना कमी हानी पोचते.
लॅपरोस्कोपिक हर्निया शस्त्रक्रियेचे फायदे: रुग्णालयातील कालावधी कमी होणे, जखम न होणे, लवकर बरे होणे, पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी
हर्नियावरील रोबोटिक शस्त्रक्रिया
नेहमीच्या शस्त्रक्रियेमध्ये मोठे छेद देऊन स्नायू कापून परत शिवले जातात; साहजिकच हर्निया परत होण्याची शक्यता अधिक असते. रोबोटिक हर्निया शस्त्रक्रिया केल्यास ती शक्यता कमी होते. कोणत्याही शस्त्रक्रियेनंतर भविष्यात आतडी एकमेकांना अथवा पोटाच्या स्नायूंना चिकटू शकतात. मात्र रोबोटिक हर्निया शस्त्रक्रिया केल्यास हे प्रमाण खूप कमी होते. यामुळे दैनंदिक कामांना पुन्हा सुरुवात करता येते. आजूबाजूच्या ऊतींचे नुकसान होत नाही , 3D व्हिज्युअलायझेशनसह अचूकतेमुळे शस्त्रक्रिया सुरळीतपणे पार पडते.
3. एक्सटेंडेड टोटली एक्स्ट्रापेरिटोनियल (Extended Totally Extraperitoneal)
ही शस्त्रक्रिया पद्धत हर्नियाच्या उपचारांसाठी वापरली जाते. यात पेरिटोनियमच्या बाहेरून, म्हणजे पोटातल्या अवयवांना स्पर्श न करता, दुरुस्ती केली जाते. या तंत्राचा वापर इनग्युनल, वेंट्रल किंवा लंबर हर्नियाच्या उपचारांसाठी केला जाऊ शकतो.याचे फायदे म्हणजे आतड्यांसंबंधी दुखापत होण्याचा धोका कमी होतो. ज्या व्यक्तींनी पूर्वी पोटाची शस्त्रक्रिया केली आहे त्यांच्यासाठी ही योग्य उपचार पध्दती आहे.
4. ट्रान्सव्हर्सस अॅबडोमिनिस रिलीज (TAR)
TAR ही मोठ्या, गंभीर किंवा वारंवार होणाऱ्या व्हेंट्रल हर्नियासाठी एक अत्याधुनिक व प्रभावी प्रक्रिया ठरते आहे. यात स्नायूंना जास्त ताण न देता प्रभावी उपचार केले जातात. ही थेरपी पोटाच्या भिंतीवरील दबाव कमी करते आणि त्यामुळे पुनरावृत्तीचा धोका कमी होतो.
5. पोटाच्या भिंतीची पुनर्बांधणी (Abdominal Wall Reconstruction)
पोटाच्या भिंतीच्या पुनर्बांधणीचा एक भाग म्हणून मोठ्या हर्नियाच्या दोषांच्या बाबतीत हे केले जाते. गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यासाठी आणि हर्निया दुरुस्त करण्यासाठी येथे स्नायूंच्या थरांमध्ये जाळी ठेवली जाते. डॉक्टरांशी सल्ल्यानंतर तुम्ही हे करू शकता. वयोवृध्दांसाठी थानिक भूल अंतर्गत शस्त्रक्रिया केली जाते
6. ओपन सर्जरी तंत्र
जरी कमीत कमी आक्रमक पद्धती आदर्श असल्या तरी, काही मोठ्या किंवा गुंतागुंतीच्या हर्नियासाठी ओपन सर्जरी योग्य ठरते आहे.
शस्त्रक्रियेनंतरची काळजी आणि पुनर्प्राप्ती :
- हर्निया शस्त्रक्रियेनंतर जलद पुनर्प्राप्तीसाठी शस्त्रक्रियेनंतर योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
- वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचा वापर करणे.
- शस्त्रक्रियेची जागा स्वच्छ ठेवणे आणि जखमेच्या काळजी घेण्यासाठी तज्ज्ञांच्या सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
- किमान तीन महिने शारीरिकदृष्ट्या कठीण क्रिया टाळणे.
- गुंतागुंत टाळण्यासाठी हलका व्यायाम करणे.
- जर तुम्हाला हर्नियाची लक्षणे दिसून आली तर गुंतागुंत टाळण्यासाठी त्वरित वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. तुमच्या शारीरीक स्थितीसाठी सर्वोत्तम शस्त्रक्रिया धोरण तज्ञांच्या मदतीने ठरवता येते, ज्यामुळे जलद बरे होता येते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























