दूध ठरू शकते लठ्ठपणाचे कारण? जाणून घ्या वेट लॉस डाएटमध्ये दुधाचा समावेश करावा की नाही?
Milk : जाणून घेऊयात दूध प्यायल्यानं होणारे फायदे...
Milk During Dieting : दूधामध्ये प्रोटीन, कॅलरी, कॅल्शियम आणि व्हिटामिन डी, बी-2 ही पोषक तत्वे असतात. थंड दूध पिण्याऐवजी जर गरम दूध पिले तर ते आरोग्यासाठी पायदेशिर ठरते. गरम दूध प्यायल्याने हाडे मजबूत होऊन शरीरात ऊर्जा निर्माण होते. पण दूध प्यायल्यानं वजन वाढते का? जास्त दूध प्यायल्यानं आरोग्यावर काय परिणाम होतो? असे प्रश्न अनेकांना पडत असतात. जाणून घेऊयात दूध प्यायल्यानं होणारे फायदे...
दुधामुळे वाढते वजन?
दुधामध्ये कॅलरी आणि फॅट्स असतात. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करत असाल तर तुम्ही योग्य प्रमाणात दूध पिणे आवश्यक आहे. एक दुधामध्ये जवळपास पाच ग्रॅम फॅट्स आणि 152 कॅलरी असतात. त्यामुळे जर तुम्ही वेट लॉस डाएट प्लॅन फॉलो करत असाल तर तुम्ही दूध कमी प्रमाणात पिले पाहिजे.
दुधामध्ये प्रोटीन असते. ज्यामुळे शरीरातील पेशी मजबूत होतात. दुधामध्ये जिंक मॅग्नीशियम, कॅल्शियम, विटामिन बी12 आणि विटामिन डी असतात. ज्यामुळे हडे मजबूत होतात. तसेच दुधामुळे इम्युनिटी देखील वाढते. एक कप दुधामध्ये आठ ग्रॅम प्रोटीन आणि 125 ग्रॅम कॅल्शियम असते. दूध प्याल्यानं जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे जर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही डाएटमध्ये दुधाचा समावेश करू शकता.
दुधामध्ये असणारे लेक्टिक अॅसिड स्किनमधील सेल्सला हेल्दी ठेवतात. तसेच त्वचेमधील मेलेनिनच्या प्रॉडक्शनला संतुलित ठेवण्याचे काम दूध करते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी तसेच डेड स्किन घालवण्यासाठी चेहऱ्याला दूधा लावावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या :
Kitchen Tips : घरच्या घरी बनवा चविष्ट व्हेज गार्लिक सूप, लहान मुलांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर!
Beauty Tips : लिंबाच्या सालीचा असा करा वापर, फाटलेल्या ओठांपासून कोंड्यापर्यंतची समस्या होईल दूर
Coffee Benefits: दररोज किती कॉफी पिणे योग्य? पाहा कॉफीचे फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha