Brain Food : कोरोनातून बरे झाल्यानंतर मेंदूला बनवा निरोगी, ‘या’ 5 गोष्टींचा करा आहारात समावेश!
Food For Brain Health : मानसिकदृष्ट्या निरोगी आणि सक्रिय राहण्यासाठी काही गोष्टींच्या सेवनाने अनेक फायदे होतात. अंडी, अक्रोड, बदाम, हिरव्या भाज्या आणि डार्क चॉकलेट खाल्ल्याने मेंदू होतो निरोगी, सक्रिय राहतो.
Covid 19 : कोरोनातून (Corona Virus) बरे झाल्यानंतर लोकांना मानसिक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मेंदूवरही परिणाम होत आहे, असे दिसून आले. कोरोनामध्ये ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत, त्यांनाही मानसिक धक्का बसला आहे. अशा स्थितीत त्याचा परिणाम लोकांच्या स्मरणशक्तीवरही होत आहे. अनेक लोकांमध्ये नैराश्याची समस्या वाढत आहे. असे बरेच लोक आहेत, जे आपल्या कुटुंबापासून दूर राहतात, अशा लोकांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय दिवसभर एकाच घरात एकत्र राहूनही अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी, आपण आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या आहारात ‘या’ 5 गोष्टींचा नक्की समावेश करावा.
भोपळ्याच्या बिया
मेंदूला निरोगी आणि सक्रिय बनवण्यासाठी भोपळ्याच्या बिया फार फायदेशीर असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर झिंक(ZINC)असते, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. याशिवाय अँटी-ऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, कॉपर आणि आयर्नही भरपूर प्रमाणात असते. भोपळ्याच्या बिया मेंदूला ऊर्जा देतात. यामुळे विचार करण्याची क्षमता सुधारते, तसेच मेंदूचा विकासही चांगला होतो.
अक्रोड
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दररोज अक्रोड खावेत. अक्रोड मेंदूला तीक्ष्ण आणि निरोगी ठेवतात. अक्रोडमध्ये असे काही पोषक घटक असतात, ज्यामुळे मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होतो. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, कॉपर, मँगनीज आणि अँटी-ऑक्सिडंट असतात.
अंडी
अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. अंडी हे शरीर आणि मन दोन्हीसाठी उत्तम अन्न आहे. अंड्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि कोलीनसारखे पोषक घटक असतात, जे मेंदूला निरोगी ठेवतात. व्हिटॅमिन बीमुळे उदासीनता आणि चिंता दूर करण्यास मदत होते, कोलीनमुळे मेंदूची शक्ती वाढते.
हिरव्या भाज्या
मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचे नियमित सेवन करावे. हिरव्या भाज्या खाल्ल्याने मेंदूला शक्ती मिळते. यासाठी आहारात पालक, ब्रोकोली आणि शेपू यांसारख्या भाज्यांचा समावेश करावा. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, फोलेट अॅसिड, बीटा कॅरोटीन आणि ल्युटीन यांसारखे पोषक घटक असतात, जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेट मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाण्यासाठी जेवढे स्वादिष्ट असते, तेवढेच त्याचे फायदेही अधिक आहेत. कोकोपासून बनवलेल्या डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटी-ऑक्सिडंट असतात, याच्या सेवनाने चिंता, तणाव आणि नैराश्य दूर होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हेही वाचा :
- Skin Care Tips: मुलायम आणि चमकदार त्वचा हवीये? वापरा अॅप्पल फेस पॅक, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत
- Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार
- Weight Loss : पांढऱ्या पदार्थांमुळे वाढते वजन, लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )