Yoga Day 2022 : योगासन सुरू करण्यासाठी ही आहेत 5 सर्वात सोपी आणि प्रभावी आसने
International Yoga Day 2022 : जर तुम्ही योगासने सुरू करणार असाल, तर जाणून घ्या 5 सर्वात सोपी आणि प्रभावी योगासने घरीच करा.
Yoga Day 2022 : अनेकांना फीट तर राहायचं असतं पण त्यांना जीमला जायला तसेच कोणताही व्यायाम प्रकार करायला कंटाळा येतो. अशा लोकांसाठी योगा हा उत्तम पर्याय आहे. योगाचे फायदे तर तुम्हाला माहितच आहेत. तर, अशीच काही सोपी आणि प्रभावी आसनं या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. जी तुम्ही अगदी सहजपणे करू शकता. ही आसने कोणती ते जाणून घ्या.
अधोमुख श्वानासन :
- अधोमुख स्वानासनामुळे संपूर्ण शरीराला चांगला ताण आणि ताकद मिळते. या आसनाचा सराव केल्याने तणाव, नैराश्य आणि निद्रानाश यांसारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होते.
- योगा मॅटवर पोटावर झोपा. श्वास घेताना शरीराला पाय आणि हात वर उचलून टेबलासारखा आकार द्या. श्वास सोडताना हळूहळू हिप्स वरच्या बाजूस करा. शरीर उलट्या 'V' आकारात बदलेल याची खात्री करा.
- या आसनाचा सराव करताना खांदे आणि हात सरळ रेषेत राहिले पाहिजेत. पाय हिप्सच्या ओळीत असतील. आता हात जमिनीच्या दिशेने दाबा. मान लांब करण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद धरा आणि त्यानंतर गुडघे जमिनीवर ठेवा.
वृक्षासन :
या आसनात झाडाप्रमाणे उभे राहून आणि संतुलन राखून केले जाणारे वृक्षासन हे नव्याने योगा शिकणाऱ्यांसाठी योग्य आसन आहे. हे आसन लक्ष केंद्रित करण्यास आणि संतुलन साधण्यास मदत करते. या आसनाच्या सरावा दरम्यान, तुम्ही श्वासोच्छ्वास संतुलित करण्यास आणि एका पायावर शरीर संतुलित करण्यास शिकता.
योगा चटईवर सावध मुद्रेत सरळ उभे रहा. दोन्ही हात मांड्याजवळ आणा. उजवा गुडघा हळूहळू वाकवून डाव्या मांडीवर ठेवा. या दरम्यान डावा पाय जमिनीवर घट्ट ठेवावा. डावा पाय सरळ ठेवा आणि श्वासोच्छवासाचा वेग सामान्य करा. हळू हळू श्वास घेताना दोन्ही हात वर करा. दोन्ही हात वर घेऊन 'नमस्कार' करण्याची मुद्रा करा. पाठीचा कणा सरळ ठेवा. आतून दीर्घ श्वास घेत राहा. श्वास सोडताना शरीर सोडा. हळूहळू हात खाली आणा. आता उजवा पायही जमिनीवर ठेवा. तुम्ही मुद्रेच्या आधी जसे उभे होतात तसेच उभे रहा. आता हीच प्रक्रिया डाव्या पायानेही करा.
ब्रिज पोज किंवा सेतुबंधनासन
पाठीचा ताण आणि पेटके दूर करण्यासाठी ब्रिज पोज हे एक उत्तम आसन आहे. सेतू बंधनासन हे खरे तर खालच्या दिशेने तोंड करून श्वास घेण्याच्या आसनाच्या उलट आसन आहे. अधो मुख स्वानासनात, जिथे शरीर पुढे झुकलेले असते. त्याच वेळी, सेतू बंधनासनामध्ये, शरीर मागील बाजूने झुकलेले असते.
योगा मॅटवर पाठीवर झोपा. तुमचा श्वासोच्छवासाचा वेग सामान्य ठेवा. यानंतर हात बाजूला ठेवा. आता हळूहळू तुमचे पाय गुडघ्यातून वाकवून नितंबांच्या जवळ आणा. मजल्यापासून शक्य तितक्या उंच नितंब वाढवा. थोडा वेळ श्वास रोखून धरा. यानंतर, श्वास सोडा आणि जमिनीवर परत या. पाय सरळ करा आणि आराम करा. 10-15 सेकंद विश्रांती घेतल्यानंतर, पुन्हा सुरू करा.
सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार हे एक उत्तम योगासन आहे जे तुम्हाला उबदार ठेवण्यास मदत करतो. उबदार होण्यासाठी आणि तुमची लवचिकता सुधारण्यासाठी हे लहान योग सत्राच्या सुरुवातीला देखील केले जाऊ शकते.
सूर्य भेदन प्राणायाम
हे आसन श्वासोच्छवासाच्या तंत्रांवर लक्ष केंद्रित करते जे फुफ्फुसाची क्षमता, तंत्रिका पेशी सुधारतात. सूर्यभेदान प्राणायाम पर्यायी श्वासोच्छवासाद्वारे शरीराचे तापमान राखण्यास मदत करते ज्यामध्ये तुम्ही उजव्या नाकपुडीतून श्वास घेता. श्वास रोखून धरा आणि डाव्या बाजूने श्वास सोडा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :