एक्स्प्लोर
Advertisement
अॅसिडिटीपासून मुक्ती कशी मिळवाल?
मुंबईः सध्याच्या धावपळीच्या काळात स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष न दिल्यामुळे अॅसिडिटी ही सर्वांसाठीच मोठी समस्या बनली आहे. अतिरिक्त पित्त अर्थात अॅसिड आपल्या शरीरात तयार होतं. ज्यामुळे सातत्याने वजन वाढणे, डोकेदुखी, मळमळ होणे, अस्वस्थ वाटणे, जेवणाची इच्छा न होणे, चक्कर येणे अशा समस्या जाणवू लागतात.
अॅसिडिटीची वाढती समस्या आपल्या शरीरासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे अॅसिडिटीवर वेळीच योग्य उपाय करणं गरजेचं आहे. अन्यथा वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते.
का होते अॅसिडिटी?
जेवणासाठी वेळ न मिळाल्यामुळे आपण फास्ट फूडसारख्या पदार्थांना प्राधान्य देतो. शरीरातील अॅसिड आणि अल्काईल या दोन घटकांचा समतोल बिघडल्यामुळे अॅसिडिटीचा त्रास जाणवतो. पाणी कमी पिणे, फास्ट फूड खाणे ही अॅसिडिटीची कारणं आहेत, असं फिटनेस एक्स्पर्ट शितल ओक सांगतात.
अॅसिडिटीवरील उपाय
जेवणाच्या वेळेतील अनियमितता हे अॅसिडिटी होण्यामागील प्रमुख कारण आहे. उन्हाळ्यात शरीरातून जास्त घाम निघतो. त्यामुळे डिहायड्रेशनचीही समस्या जाणवते. जास्तीत जास्त पाणी पिणे हा अॅसिडिटीवर चांगला उपाय ठरु शकतो.
शेंगदाणे, आईस्क्रीम, तिखट पदार्थ, तेलकट पदार्थ, चॉकलेट असे पदार्थ खाणे टाळावेत. उन्हाळ्यात या पदार्थांचं सेवन केल्याने जास्त त्रास होतो, असं शितल ओक यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement