(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : एका दिवसात किती काजू खाणे आरोग्यासाठी चांगले आहे? घ्या जाणून
काजू आपण दिवसभरात रोज किती खाणे योग्य आहे? शरीराला त्याची किती गरज आहे? याबद्दल लोकांमध्ये अनेकदा गोंधळ होतो. तर आपल्या निरोगी राहण्याकरता किती काजू खाणे गरजेचे आहे. हे जाणून घेऊयात.
How Many Cashew To Eat In A Day : ड्रायफ्रुट्स खाणे शरीराकरता खूप चांगले आहे. त्यात असणारे पोषक तत्वे अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवतात. याच ड्रायफ्रुटमधील काजू आपण दिवसभरात रोज किती खाणे योग्य आहे? शरीराला त्याची किती गरज आहे? याबद्दल लोकांमध्ये अनेकदा गोंधळ होतो. तर आपल्या निरोगी राहण्याकरता किती काजू खाणे गरजेचे आहे. हे जाणून घेऊयात.
रोज 10-15 काजू खावेत
पोष्टिक घटकांनी युक्त असे काजू प्रत्येकालाच खायला आवडतात. मात्र हेल्थ एक्सपर्टने दिलेल्या माहितीप्रमाणे दिवसभरात रोज 10-15 काजू खावेत. पण काजू किंवा इतर गोष्टी खाताना त्या प्रमाणात आपण खात आहोत याची काळजी घ्या. कारण मर्यादित मात्रात कोणताही पदार्थ खाणे शरीराकरता योग्य आहे. काही लोक काजू हलके भाजून मग खातात. काजूचा वापर प्रामुख्याने खीर, गोड पदार्थ हलवा इत्यादीत वापरले जातात. जाणून घेऊयात काजू किती खाणे योग्य आहे.
काजूतील पौष्टिक तत्वे
काजूत मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, विटामीन ए, सी, के, बी6 काॅपर, फाॅस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. हे सर्व आपल्या शरीराकरता पोषक असतात. यामुळे अनेक आजार दूर होतात आणि आपले शरीर निरोगी
राहते. काजू मेंदूसाठी चांगले आहेत आणि मेंदूची शक्ती वाढवण्याचं काम काजू करतात. याशिवाय काजूमध्ये विशेषतः लोह आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. लोह तुमच्या सर्व पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते, ज्यामुळे अशक्तपणा येत नाही आणि जस्त निरोगी आरोग्य आणि निरोगी दृष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे. काजू मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत असल्यामुळे ते स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतो. काजूमुळे शरीरातील कोलेस्ट्राॅल देखील कमी होण्यास मदत होते.
एका दिवसात किती काजू खावेत? (How Many Cashew To Eat In A Day?)
योग्य प्रमाणात जर काजू खाल्ले नाहीत तर वजन मोठ्या प्रमाणात वाढते. जर तुम्हाला तुमचे वजन वाढू द्यायचे नसल्यास तुम्ही दिवसात योग्य प्रमाणात काजू खाणे गरजेचे आहे. शरीराला निरोगी ठेवण्याकरता दररोज फक्त 10-15 काजू खाणे गरजेचे आहे. मात्र तुमचे वजन कमी आहे आणि तुम्हाला वजन वाढवायचे आहे तर तुम्ही दिवसात केवळ 15-30 खा. काजू खाल्यानंतर तुमचे पोट जड वाटत असेल तर तुम्ही लगेच डाॅक्टरांचा किंवा डायटेशियनचा सल्ला घ्या.
इतर महत्वाच्या बातम्या
Banana For Diabetes : मधुमेह रुग्णांनी केळी खावी का? त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )