World Health Day 2022 : जागतिक आरोग्य दिन नेमका का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
World Health Day 2022 : जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आरोग्य हे मानवी आनंद आणि कल्याणासाठी गरजेचे आहे.
World Health Day 2022 : आरोग्यामध्ये केवळ शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्याही तंदुरूस्त असणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असेल तर त्या व्यक्तीला निरोगी म्हटलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आरोग्य हे मानवी आनंद आणि कल्याणासाठी मूलभूत आहे. हे आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देते, कारण निरोगी व्यक्ती अधिक काळ आयुष्य आनंदी जगू शकते असे म्हटलं आहे. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी, जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
जागतिक आरोग्य दिनाची तारीख (World Health Day 2022 Date) :
जागतिक आरोग्य दिन 2022 दरवर्षी 7 एप्रिल रोजी आमच्या वैद्यकीय विद्याशाखेचे व्यापक योगदान आणि जागतिक आरोग्य संघटनेचे यश ओळखण्यासाठी साजरा केला जातो.
जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास (World Health Day 2022 History) :
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) 1948 मध्ये पहिली जागतिक आरोग्य सभा बोलावली. ज्यामध्ये "जागतिक आरोग्य दिन" साजरा मागणी करण्यात आली. पहिला जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 1950 रोजी आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर दरवर्षी त्या तारखेला साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या चिंतेचे प्राधान्य क्षेत्र हायलाइट करण्यासाठी विशिष्ट आरोग्य विषयाबद्दल जागरुकता वाढवणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
जागतिक आरोग्य दिनाचं महत्त्व (World Health Day 2022 Importance) :
मानवी आरोग्याच्या दृष्टीने या विषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातात. शारिरीक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने दक्ष असणं गरजेचे आहे त्यामुळे जागतिक आरोग्य दिनाचे विशेष महत्त्व आहे. WHO देखील जागतिक स्तरावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात.
गेल्या दोन वर्षात भारतासह जगभरात कोविड 19 च्या संकटात आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या किती फीट राहणं गरजेचं आहे याचं महत्त्व आपल्याला पटलंच असेल.
महत्त्वाच्या बातम्या :
- Health Tips : शरीरात अशक्तपणा जाणवतोय? काळजी करू नका; 'या' 10 पदार्थांचा आहारात समावेश करा
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )