एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Health Tips : शरीरात अशक्तपणा जाणवतोय? काळजी करू नका; 'या' 10 पदार्थांचा आहारात समावेश करा

Health Tips : लोकांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

Health Tips : लोकांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. दैनंदिन जीवनशैलीत खाण्या-पिण्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत. अशा वेळी अवेळी जेवण केल्याने शरीराला अनेक त्रास होतात. त्याचबरोबर आपले शरीर आणि मन दोन्ही निरोगी असणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे.  हे पदार्थ नेमके कोणते ते जाणून घ्या. 

पालक - पालक हे पोषक तत्वांनी युक्त सुपरफूड आहे. आरोग्य तज्ञ पालक हे पृथ्वीवरील सर्वात आरोग्यदायी अन्न मानतात. पालक एनर्जीने भरलेला असतो आणि त्यात खूप कमी कॅलरीज असतात. पालक हे व्हिटॅमिन ए आणि के यांचा चांगला स्त्रोत मानला जातो. 

लसूण - लसणाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. लसणात बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता असते. शतकानुशतके रोगांपासून संरक्षण म्हणून त्याचा वापर केला जातो. शक्तिशाली दाहक-विरोधी लसूण कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. 

लिंबू - लिंबूने हेल्थ इंडस्ट्रीमध्ये सुपरफूड म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या लिंबूवर्गीय फळामध्ये दाहक विरोधी गुण तर आहेतच. पण ते शरीरात कर्करोगाच्या पेशी विकसित होण्यापासून रोखू शकतात. यामध्ये व्हिटॅमिन सी संत्र्यांइतकेच असते. लिंबू आपल्या यकृत आणि आतड्यांसाठीदेखील खूप फायदेशीर आहे. 

बीट - बीट केवळ आपल्या मेंदूसाठी चांगले नाही तर ते रक्तदाबही नियंत्रित ठेवते. ते खाल्ल्याने व्यायामाची कार्यक्षमता वाढते. आणि स्मृतिभ्रंशाचा धोकाही कमी होतो. या भाज्यांमध्ये फॉलेट, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात. 

डार्क चॉकलेट - चॉकलेटमध्ये उच्च अॅंटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे फ्री रॅडिकल्समुळे होणारे रोगदेखील प्रतिबंधित करतात. डार्क चॉकलेट कॅन्सरपासून बचाव करते. 

कडधान्ये - मसूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिने असल्यामुळे ते सुपरफूड मानले जाते. यामध्ये असलेले पोषक तत्व आपल्या हृद्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहेतच पण वजन कमी करण्यासाठी, ऊर्जा वाढविण्यासाठी आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. 

अक्रोड - कोणत्याही ड्रायफ्रूटपेक्षा अक्रोडमध्ये जास्त अॅंटीऑक्सिडंट्स असतात. असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. अक्रोड रक्तवाहिन्यांमधील जळजळ तसेच ऑक्सिडेशन कमी करते. दररोज किमान 8 अक्रोड खावे. 

सॅल्मन फिश - सॅल्मन फिश ओमेगा-3 फॅटी एॅसिडचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे नैराश्य तसेच हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. यामध्ये उच्च प्रथिने, जीवनसत्व आणि खनिजे देखील चांगले असतात. 

एवोकॅडो - एवोकॅडोची गणना जगातील सर्वात शक्तिशाली वस्तूंमध्ये केली जाते. आरोग्यदायी फॅटी एॅसिड्स आणि फायबरने समृद्ध असलेले एवोकॅडो आपले डोळे, संधिवात आणि कर्करोगाचा धोका कमी करते. 

रास्पबेरी - रास्पबेरी खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकाराचा धोका कमी होतो. रास्पबेरी खाल्ल्याने आपल्या शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abu Azmi On BJP | वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने केला, अबू आझमींची टीकाGulabRao Patil On Ladki Bahin Yojana | आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाही - गुलाबराव पाटीलNitin Gadkari Nagpur Bus : विमानासारख्या सुविधा बसमध्ये मिळणार, गडकरींनी सांगितलेली बस नेमकी कशी?एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 04 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मीडियावर नंबर वन पण कामात...  या महिला अधिकाऱ्याच्या बदलीची देशभरात चर्चा
सोशल मीडियावर नंबर वन पण कामात... या महिला अधिकाऱ्याच्या बदलीची देशभरात चर्चा
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
Embed widget