फक्त एकच महिना बटाट्यापासून दूर राहा अन् फरक पाहा; शरीरात दिसतील 'हे' महत्त्वाचे बदल!
Health Benifits For Potato: भारतीय खाद्य संस्कृतीत बटाट्याचा उपयोग जास्त केला जातो, मग ते शाकाहारी जेवण असो वा मांसाहारी. जर तुम्ही कोणाला विचारलं तर कदाचितच कोणी बटाटा आवडत नाही, असं उत्तर देईल.
Weight Loss Diet : बटाटा (Potato), सर्वांचा आवडता आणि सर्वांचा लाडका. कदाचितच कोणी असेल ज्याला बटाटा आवडत नसेल. बटाटा एवढा भारी आहे की, तुम्ही त्याला कोणत्याही भाजीसोबत घालू शकता. किंवा फक्त बटाटा तळून (Fried Potato) खाऊ शकता. एक ना, तर अनेक पद्धतींनी तुम्ही बटाटा वापरुन विविध पदार्थ तयार करू शकता. कधी तर झटपट कोणती भाजी करायची असेल, तर डोळ्यांसमोर पटकन बटाटाच येतो. पण सर्वांना आवडणारा बटाटा आरोग्यासाठी (Health Benifits For Potato) तेवढा फायदेशीर ठरतो का?
भारतीय खाद्य संस्कृतीत बटाट्याचा उपयोग जास्त केला जातो, मग ते शाकाहारी जेवण असो वा मांसाहारी. जर तुम्ही कोणाला विचारलं तर कदाचितच कोणी बटाटा आवडत नाही, असं उत्तर देईल. अनेकदा वजन कमी करणाऱ्यांना किंवा संधीवाताचा त्रास असलेल्यांना आहारातून बटाटा हद्दपार करण्याचा सल्ला देतात. पण खरंच बटाटा खाल्ल्यानं वजन वाढतं का? आज आम्ही तुम्हाला एखादा महिनाभर बटाट्यापासून लांब राहिल्यानं शरीरात काय बदल होतात? हे सांगणार आहोत.
बटाट्यानं वजन वाढतं? (Potato Increase Weight?)
जर तुम्ही तुमच्या वाढलेल्या वजनानं हैराण झाला असाल आणि वेट लॉस डाएट फॉलो करणार असाल, तर सर्वात आधी तुम्हाला बटाट्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो. वजन कमी करण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करताना त्या डाएटमधून बटाट्याला मात्र बाहेरचा रस्ता दाखवला जातो. पण का? कारण बटाटा वजन कमी करण्यासाठी मदत करत नाही, उलट बटाट्यानं वजन वाढतं.
बटाट्यापासून दूर का राहावं?
बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅलरी असतात. बटाटा डाएट प्लानमधून हद्दपार केला तर, तुमच्या शरीरात फॅट्स जात नाहीत आणि वजन नियंत्रणात राहतं. जर तुम्ही डायबिटीज असेल तर तुम्ही बटाट्यापासून काडीमोड घेतलेलाच तुमच्यासाठी फायद्या ठरेल. बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टार्च असतं. या स्टार्चमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मधुमेहींना बटाट्याचं सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.
बटाट्याचा आहारात समावेश न केल्यानं शरीरातील कायर्बोहायड्रेटचं प्रमाणही कमी होतं. ज्यामुळे मेटाबॉलिक हेल्थ सुधारते. बटाट्यापासून तयार करण्यात आलेले प्रोसेस्ड फूड म्हणजेच, बटाट्याचे वेफर्स आणि फ्रेंच प्राईजमध्ये मिठाचं प्रमाण अधिक असतं. जर याचं सेवन केलं तर तुम्ही हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाशी संबंधित आजारांना स्वतःहून आमंत्रण देत असता. त्यामुळे असे पदार्थही खाणं टाळा किंवा कमी करा.
बटाट्याला पर्याय काय?
दरम्यान, बटाटा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. तसेच, बटाट्यात व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि फायबर यांसारखी पोषक तत्वही मुबलक प्रमाणात आढळतात. ही पोषक तत्त्वही शरीरासाठी आवश्यक असतात. त्यामुळे बटाटा डाएटमधून पूर्णपणे हद्दपार करण्यापेक्षा बटाटा खाण्याचं प्रमाण कमी करणं उत्तम पर्याय ठरेल. तसेच, जर तुम्हाला बटाट्याचा डाएटमध्ये समावेश करायचाच नसेल, तर मात्र तुम्हाला बटाट्यासाठी पर्याय शोधावा लागेल. तुम्ही बटाट्याऐवजी रताळं, फ्लॉवर, कोबी यांचा आहारात समावेश करू शकता.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मासिक पाळीतील भयंकर वेदना; पोटदुखी, अंगदुखीसह सर्व त्रासापासून काही सेकंदात होईल सुटका
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )