Weight Loss Tips : झटपट वजन कमी करायचंय? मग 'या' 10 टिप्स तुमच्यासाठीच
Weight Loss Tips : झटपट वजन कमी करायचंय? वाढणारं वजन ही सध्याच्या काळातील सर्वांना भेडसावणारी समस्या. पण त्यासाठी नेमकं काय करावं? हा अनेकांना पडणारा प्रश्न.
मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अन् कामाच्या ताणात आपलं तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष होतं. मग वाढलेलं वजन आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याच जणांना वर्क फ्रॅाम होम करावं लागत आहे. त्यामुळे खूप जणांना शारिरिक आणि मानसिक आजारांचादेखील सामना करावा लागत आहे. यासर्व समस्यांमधील सर्वांना भेडसावणारी प्रमुख समस्या म्हणजे, लठ्ठपणा. वाढणाऱ्या वजनामुळे अनेकजण खूप त्रस्त आहेत. अशातच बुहुतेकजण वजन कमी करण्यासाठी डाएट करतात. पण नुसतं डाएट डाएट असं म्हणून चालत नाही. त्यासाठी डाएट समजून घेणं गरजेचं आहे.
डाएट हा एक वजन कमी करण्यासाठीचा उत्तम उपाय आहे. जर आपण आपल्या डाएटमध्ये योग्य पदार्थांचा समावेश केला तर डाएट परिणामकारक ठरतं. पण असे कोणते पदार्थ आहेत की, ज्यानं आपलं डाएट सुरळीत होऊ शकतं. यासाठी आज आम्ही तुम्हाला 10 टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळं वाढतं वजन, वाढलेली चरबी कमी करण्यास सोईचं होईल.
1 .वजन कमी करण्यासाठी डाएट करणं गरजेचं नाही, मात्र डाएटमधील काही पदार्थांचा आपल्या आहारात समतोल राखणं हे जास्त गरजेचं आहे.
2. वजन कमी करण्यासाठी शक्यतो तळलेले पदार्थ कमी खावेत. त्याजागी भाजलेले किंवा शिजवून तयार केलेले पदार्थ खावे.
3. आपण जर मद्य पदार्थाचे सेवन करत असाल तर ते टाळावे. कोल्ड ड्रिंक्स सारख्या गोष्टींना टाळणं फायदेशीर ठरतं. याउलट आइस्क्रिम मात्र वजन कमी करण्यास अगदी उत्तमच. काही निष्कर्षांमधून निष्पन्न झाल्यानुसार, आइस्क्रिम वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
4. गोड पदार्थ, साखरचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाणं टाळावं. त्यामुळे शरीरातील कॅलरी कमी होतात. फॅट कमी करण्यासही मदत होते.
5. गोड पदार्थांचे सेवन टाळल्यास शरीरातील कॅलरिज कमी होतात, शिवाय फॅट कमी करण्यास मदत होते.
6. वजन कमी करण्यासाठी आपण काजू-बदाम यांसारखे ड्रायफ्रुट्स खावेत. त्यामुळे आपल्या मांसपेशींना चालना मिळते. आणि यांत फायबर असल्याने भूख लागणं कमी होते.
7. पालेभाज्या आणि फळांचे योग्य प्रमाणात सेवन करावं. कारण यात फायबर असल्यामुळं आपल्या वाढलेल्या कॅलरिज कमी करण्यास मदत होते.
8. दररोजच्या आहारात पाण्याचे प्रमाण वाढवावं. पाणी हे आपल्या शरीराला सतत हायड्रेड ठेवतं.
9. जास्त प्रमाणाच्या कॅलरि असणाऱ्या पदार्थाचं सेवन केल्यावर त्यावर भरपूर पाणी प्यावे. तसेच पाण्याऐवजी ग्रीन टी किंवा हर्बल टी घेऊ शकता. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
10. दररोज व्यायाम करणं, योगाभ्यास, चालणं, धावणे हे सर्व केल्यानं वाढतं वजन झटपट कमी होण्यात मदत होते आणि आपले वजनसुद्धा नियंत्रणात राहते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Weight Loss : लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं?
- Weight Loss: आता शरीराचं वाढलेलं वजन कमी करणार 'जपानी वॉटर थेरपी'
- सॅनिटायजरच्या चुकीच्या वापराने मुलं होऊ शकतात अंध! अभ्यासातून माहिती समोर
- वजन कमी करायचंय?; दररोज करा आवळ्याच्या ज्यूसचं सेवन, होतील फायदेच फायदे
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )