Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शिर्डीतील पक्षाच्या अधिवेशनात मोठं वक्तव्य केलं आहे.
अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अधिवेशन शिर्डीत पार पडलं. या शिबिराला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षसंघटना बांधणीसंदर्भात मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी महायुतीच्या विजयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांच्या वीज माफीच्या योजना महत्त्वाची ठरल्याचं अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील करदात्या, नोकरदार आणि ऊस उत्पादक महिलांबाबत वेगळा विचार सुरु असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. योजना सुरुच राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
आपण दोन महत्त्वाच्या योजना आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील तमाम बहिणींनी आपलीशी वाटली, त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. त्याचा चांगला परिणाम महायुती सत्तेवर येण्यात झाला. माझा शेतकरी आहे, काळ्या इमानेइतबारे सेवा करणाऱ्या तीन, पाच आणि साडे सात हॉर्स पॉवरच्या पंपधारक शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा फायदा झाला. पण, त्यावेळी वेळ कमी होता. आम्हाला महिला व बालविकास विभागातर्फे महिलांपर्यंत पोहोचायचं होतं, पुढच्या तारखा आचारसंहितेच्या येत होत्या. आयटी विभागाला घेऊन काय करता येईल,शिवराज सिंह चौहान यांनी काय केलं, आपल्याला काय करता येईल, असा विचार केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
हसन मुश्रीफ यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे, वैयक्तिक लाभ त्या लाभार्थ्याला मिळतो त्यावेळी तो लक्षात ठेवतो. जनरल तर काम किती केलं की लोकं म्हणतात ते त्यांचं काम आहे. त्यामुळं वैयक्तिक काम आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याला आर्थिक शिस्त, केंद्रानं लावलेले निकष आहेत, कर्ज किती काढू शकता? स्थूल उत्पन्न किती आहे, जीएसटी किती येतोय, महत्त्वाच्या खात्यातून उत्पन्न कसं वाढेल. लोकांना अन्न देण्याचं महत्त्वाचं काम आहे. कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण, महिला बालविकास खाती आहेत. या खात्याच्या माध्यमातून त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येईल याचा विचार करावा लागेल, असं अजित पवार यांनी म्हटलं.
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार करणार
योजना चालू राहणार की नाही राहणार, काही काही गोष्टी निवडणुकीच्या जाहीरनाम्याच्या निमित्तान होत्या, त्याच्या खोलात जाणार नाही. मला एवढंच सांगायचं आहे, माझी लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत कायम ठेवायची आहे, काळजी करु नका. पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं, तो गरजू महिलेला मिळाला पाहिजे. जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्त आयकर भरते, ऊस जातो, नोकरी आहे, अशांसाठी वेगळा विचार आम्ही करतोय. योजना खऱ्या अर्थानं माझ्या माय माऊलींच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे होते, गरीब महिलेकरता पोहोचायला पाहिजे होती ते करायचं काम महिला व बालविकास विभागनं केलं आहे. परवाच महिला बालविकासला 3700 कोटींचा चेक दिलेला आहे. महिलांना 26 तारखेच्या आत पैसे येतील, याची खात्री देतो, असं अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या :