Omicron Variant : तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात 'हे' सुपरफूड, जाणून घ्या याचे फायदे
Health Tips : Omicron ने लोकांना घाबरवले आहे. अशा परिस्थितीत आरोग्यासोबतच रोगप्रतिकारक शक्तीचीही काळजी घेणे गरजेचे आहे. येथे आम्ही तुम्हाला काही सुपरफूड्स सांगणार आहोत ज्यांचे सेवन केले पाहिजे.
Boost Immunity : सध्या हिवाळा सुरू आहे. त्याच वेळी, कोरोनाव्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननेदेखील (Omicron) दहशत निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत आरोग्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्तीचीही काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही सुपरफूड्स सांगणार आहोत, ज्याचे सेवन करून तुम्ही स्वतःला सुरक्षित आणि निरोगी ठेवू शकता. ते सुपरफूड कोणते हे जाणून घेऊयात.
तूप (Ghee) - तूप हे सहज पचण्याजोगे फॅट्सपैकी एक आहे. तुम्हाला उबदार ठेवण्यासोबतच, ते दिवसभर ऊर्जा निर्माण करू शकते. याबरोबरच तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढवते. याशिवाय जर तुम्ही रोज तुपाचे सेवन करत असाल तर ते तुमची त्वचा कोरडी होण्यापासून आणि केस गळण्यापासून बचाव करते. दुसरीकडे, तुम्ही तांदूळ, मसूर किंवा ब्रेडमध्ये उत्तम चवीसाठी वापरू शकता.
रताळे (Sweet potato) - यामध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि इतर पोषक तत्व भरपूर प्रमाणात असल्याने बद्धकोष्ठता दूर होते. यासोबतच रताळ्याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. याचे दररोज सेवन केल्याने तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता देखील पूर्ण होते. याचे सेवन करण्यासाठी तुम्ही ते भाजून खाऊ शकता किंवा दुधात उकळून त्याचे सेवन करू शकता.
ब्रोकोली (Broccoli) - ब्रोकोली हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. आम्ही तुम्हाला सांगतो की एक कप ब्रोकोलीमध्ये संत्र्याइतकेच व्हिटॅमिन सी मिळते. ब्रोकोलीमध्ये बीटा कॅरोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त आणि लोह भरपूर प्रमाणात असते. त्याच वेळी, ब्रोकोलीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते उकळवून खाणे.
आले (Ginger) - त्यात ऑक्सिडेटिव्ह आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे हिवाळ्यात घसा खवखवणे बरे करू शकतात. यासोबतच याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : विड्याच्या पानाचे आरोग्यदायी आणि सौंदर्यदायी फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या...
- Health Benefits Of Kiwi : रोज किवी खा, विटामिन सीची कमतरता दूर करा
- Covid19 : कोरोनाचा डोळ्यांवर परिणाम; 90 टक्के लोकांच्या दृष्यमानतेत फरक झाल्याचा दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )