Health Tips : शरीरात सूज येण्याला तुमच्या 'या' वाईट सवयी कारणीभूत! गंभीर आजाराचं लक्षण; आजच बदल करा नाहीतर...
Body Inflamation Causes : शरीरावर सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. ही सूज शरीरातील समस्या दर्शवतात. अनेक वेळा तुमच्या खाण्याच्या सवयी देखील सूज येण्यास कारणीभूत ठरतात. याबाबत सविस्तर वाचा.
Unhealthy Eating Habits cause Inflamation : काही पदार्थ खाल्ल्यावर आपल्या शरीरावर लाल चट्टे, सूज किंवा खाज येण्याची समस्या उद्भवते. काही पदार्थ खाल्ल्यावर तुम्हालाह अशी समस्या जाणवते का? याला तुमच्या वाईट सवयी कारणीभूत असू शकतात. सध्याच्या धक्का-धक्कीच्या आणि व्यस्त जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, ज्याला आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतो. याबाबत सविस्तर जाणून घ्या.
वारंवार शरीरावर सूज किंवा चट्टे येतात?
इंफ्लेमेशन म्हणजेच शरीरावर सूज येण्याची किंवा लालसर चट्टे येण्याची समस्या तुम्हालाही अनेकदा उद्भवली असेल. शरीरात कधी-कधी इन्फेक्शन होणं साधारण आहे. पण, जर तुमच्यासोबत हे वारंवार होत असेल, तर हे गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे याकडे दुर्लभ न करता वेळीच उपाय करणं आवश्यक आहे.
'हे' गंभीर आजाराचं लक्षण
दीर्घकाळ जळजळ किंवा सूज गंभीर आजारांचे लक्षण ठरू शकते, हे मधुमेह आणि हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाची लक्षणे असू शकतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे अन्न आणि तुमच्या आहाराच्या वाईट सवयी. वाईट सवयींमुळे तुमच्या पोटात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांना त्रास होऊ लागतो. खाण्याशी वाईट सवयींमुळे शरीरात जळजळ आणि सूज वाढते. याबद्दल सविस्तर वाचा.
'या' वाईट सवयी आजच बदला
जास्त प्रक्रिया केलेले अन्न खाणं
जर तुमच्या आहारात जास्त प्रक्रिया केलेले मांस, बर्गर, साखरयुक्त पेय, कँडीज, हॉट डॉग, बटाटा चिप्स याचा समावेश असेल तर, तुम्हाला जळजळ होण्याच्या समस्येला सामोरे जावं लागू शकतं. काही संशोधनानुसार, अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचा आहारात समावेश केल्याने शरीरातील चांगल्या बॅक्टेरियाचे संतुलन बिघडते. त्यामुळे पचनसंस्थेचं कार्य बिघडतं.
साखरेचा जास्त वापर
जवळजवळ प्रत्येक गोष्टीत साखर आढळते. काहींमध्ये नैसर्गिक तर काहींमध्ये प्रक्रिया केलेली. एका अभ्यासानुसार, जास्त साखर खाल्ल्याने हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणा तसेच दीर्घकाळ जळजळ होण्याची समस्या उद्भवते. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे खाण्याआधी कोणत्या पदार्थात साखरेचे प्रमाण जास्त आहे आणि कोणत्या कमी आहे, हे पाहणे आवश्यक आहे.
आहारात भाज्या आणि फायबरचा समावेश कमी
आहारात फळे आणि भाज्यांचा अधिक समावेश केल्यास वारंवार सूज येणे आणि जळजळ होण्याची समस्या कमी होऊ शकते, असं 2018 मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात समोर आलं आहे. प्रथिने आणि फायबरयुक्त आहाराचं सेवन केल्याने जळजळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. हिरव्या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमच्या शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात.
जास्त प्रमाणात ग्लूटेनचं सेवन
जास्त प्रमाणात ग्लूटेनचं सेवन ही सूज आणि जळजळ याला कारणीभूत असू शकतात. ग्लूटेन हा गहू आणि धान्यांमध्ये आढळणारे एक प्रकारचा प्रथिने आहे. ग्लूटेन ब्रेड, पिझ्झा आणि तृणधान्यांमध्ये देखील आढळतो. काही लोक कोणत्याही समस्यांशिवाय ग्लूटेन खाऊ शकतात, परंतु काही लोक ग्लूटेनसाठी संवेदनशील असतात. ग्लूटेनच्या संवेदनशीलतेमुळे, शरीराला जळजळ होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.
जास्त प्रमाणात मद्यपान करणे
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शरीरात जळजळ होण्याची आणि सूज येण्याची समस्या वाढू शकते. दररोज मद्यपान केल्याने आतड्यांमध्ये जळजळ होऊ शकते आणि चांगल्या बॅक्टेरियाचे संतुलन बिघडू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Government Alert : सावधान! Meftal SPAS स्पास पेनकिलर खाताय? सरकारकडून धोक्याचा इशारा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )