एक्स्प्लोर

Trending : अजबच..12 वर्षांपासून फक्त 30 मिनिटांचीच झोप! जपानी व्यावसायिकाच्या यशाचे रहस्य काय? लाईफस्टाईल चर्चेत

Trending : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण एक जपानी व्यावसायिक 12 वर्षे फक्त 30 मिनिटंच झोपतो, यामुळे त्याला थकवा जाणवत नाही, काय आहे त्याच्या यशाचे रहस्य?

Trending : आपल्या निरोगी आरोग्यासाठी, तसेच दैनंदिन आयुष्यात झोपेचं महत्त्व किती आहे, हे सर्वांनाच माहित आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आपल्याला दिवसातून किमान 7-8 तास झोप मिळणे आवश्यक आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण एक जपानी व्यावसायिक (Japan Businessman) 12 वर्षे फक्त 30 मिनिटंच झोपतो, यामुळे त्याला थकवाही जाणवत नाही, काय आहे त्याच्या यशाचे रहस्य? या व्यक्तीची लाईफस्टाईलही तितकीच चर्चेत आहे. जाणून घ्या...

दिवसातून फक्त 30 मिनिटंच झोप? व्यावसायिक म्हणतो...

जपानमधील एक व्यक्ती गेल्या 12 वर्षांपासून दररोज फक्त 30 मिनिटे झोपतो. डायसुके होरी नावाच्या 40 वर्षीय व्यक्तीचे म्हणणे आहे की, त्याने आपले शरीर आणि मन अशाप्रकारे सेट केले आहे की, त्याला अधिक झोपेची गरज नाही. तो म्हणतो की, काम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्याने असे केले. होरी हा व्यवसायाने व्यापारी आहे. तो आठवड्यातून 16 तास जिममध्ये घालवतो. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, होरीला 12 वर्षांपूर्वी कमी झोपण्याची सवय लागली होती. 2016 मध्ये त्यांनी जपान शॉर्ट स्लीपर्स ट्रेनिंग असोसिएशनची सुरुवात केली. येथे तो लोकांना आरोग्य आणि झोपेशी संबंधित प्रशिक्षणही देतो.

आजपर्यंत 2100 विद्यार्थ्यांना कमी झोपण्याचे प्रशिक्षण

या जपानी व्यावसायिकाने आत्तापर्यंत त्यांनी 2100 विद्यार्थ्यांना अगदी कमी वेळ झोपूनही निरोगी राहण्याची युक्ती शिकवली आहे. जोपर्यंत तुम्ही खेळ आणि व्यायाम करत आहात, तोपर्यंत तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, असे होरीने सांगितले. जेवणाच्या एक तास आधी कॉफी पिणे देखील यामध्ये उपयुक्त ठरते. हे झोप आणि थकवा दोन्ही प्रतिबंधित करते. जपानच्या योमिउरी टीव्हीने होरीच्या दैनंदिन दिनक्रमावर एक शो देखील केला. यामध्ये त्याने होरीचे संपूर्ण कामकाजाचे 35 दिवस रेकॉर्ड केले होते. या काळात एके दिवशी तो फक्त 26 मिनिटंच झोपला. होरी म्हणते की, अनेक तास झोपण्यापेक्षा चांगली झोप घेणे महत्त्वाचे आहे. काही वेळ सुद्धा जर आपण नीट झोपू शकलो तरी दीर्घ झोपेची गरज नाही.

झोप कमी झाल्यामुळे स्मरणशक्ती कमकुवत, हृदयविकाराचा धोका - डॉक्टर

सर्वसामान्य व्यक्तीने दररोज 6 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे मन आणि शरीराचा थकवा दूर होऊन दुसऱ्या दिवसासाठी तयार होण्यास मदत होते. याशिवाय हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. डॉक्टरांच्या मते, खूप कमी झोप घेणे प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य नाही. याचे अनेक दुष्परिणामही होऊ शकतात. जास्त वेळ झोप न घेतल्याने स्मरणशक्ती कमी होणे, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो.

अन्न-पाण्याविना सुर्याच्या ऊर्जेवर जीवन?? 400 हून अधिक डॉक्टरांनी केला अभ्यास

जपानचे दायसुके होरींच्या अजब दाव्यानंतर यापूर्वी गुजरातचे योगी प्रल्हाद जानी यांनी देखील दावा केला होता की, ते 1940 पासून अन्न-पाण्याविना जगत आहेत. ते फक्त सूर्याच्या ऊर्जेवर जगत होते. 2020 साली वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी देहत्याग केला. प्रल्हाद जानी यांच्या आयुष्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी 2003 साली त्यांना 24 तास आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर 400 डॉक्टर आणि 20 समित्यांनी त्याच्या शरीरातील बदलांवर लक्ष ठेवून संशोधन केले. यानंतर 2007 मध्ये पुन्हा चाचण्या घेण्यात आल्या. 2009 मध्ये दिल्लीच्या टीमने 6 साक्षीदारांच्या उपस्थितीत संशोधनही केले होते. मात्र, त्यांच्या आयुष्याचे रहस्य कधीच कळू शकले नाही.

हेही वाचा>>>

OMG...मंकीपॉक्सचा मेंदूवरही होतोय परिणाम? परदेशात वाढतेय रुग्णसंख्या, तज्ज्ञांनी काय इशारा दिला?

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Onion Import : कांद्याची आयात थांबवा अन्यथा, मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 
कांद्याची आयात थांबवा अन्यथा, मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 
Chandrashekhar Bawankule: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात बहाल
अजितदादांच्या अर्थखात्याचा विरोध डावलून चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात बहाल
पंडीत पाटील विधानसभा लढवणार, जयंत पाटील काय भूमिका घेणार? अलिबागमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरुन शेकापत गृहयुद्ध
पंडीत पाटील विधानसभा लढवणार, जयंत पाटील काय भूमिका घेणार? अलिबागमध्ये  विधानसभेच्या उमेदवारीवरुन शेकापत गृहयुद्ध
Congress : विदर्भ भाजपच्या हातून गेलाय, मोदी शाह जोडीने कितीही प्रयत्न केले तर काँग्रेस 45 जागा जिंकणार, विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर
मोदी चंद्रपूर अन् भंडारा गोंदियाला गेले तिथं पराभव झाला, नागपूरला आले असते तर गडकरी हरले असते : विजय वडेट्टीवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter : मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयची हत्या, वडिलांचा आरोपTOP 80 : 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 25 Sept 2024 :  ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 25 Sept 2024 : ABP MajhaAmit Shah : आंदोलने, कृषीमालाचे प्रश्न नेत्यांवर सोडा, कामाला लागा; शाहांचा कानमंत्र, इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Onion Import : कांद्याची आयात थांबवा अन्यथा, मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 
कांद्याची आयात थांबवा अन्यथा, मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 
Chandrashekhar Bawankule: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात बहाल
अजितदादांच्या अर्थखात्याचा विरोध डावलून चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात बहाल
पंडीत पाटील विधानसभा लढवणार, जयंत पाटील काय भूमिका घेणार? अलिबागमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरुन शेकापत गृहयुद्ध
पंडीत पाटील विधानसभा लढवणार, जयंत पाटील काय भूमिका घेणार? अलिबागमध्ये  विधानसभेच्या उमेदवारीवरुन शेकापत गृहयुद्ध
Congress : विदर्भ भाजपच्या हातून गेलाय, मोदी शाह जोडीने कितीही प्रयत्न केले तर काँग्रेस 45 जागा जिंकणार, विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर
मोदी चंद्रपूर अन् भंडारा गोंदियाला गेले तिथं पराभव झाला, नागपूरला आले असते तर गडकरी हरले असते : विजय वडेट्टीवार
शेतमालाचे दर वाढले की सरकारच्या पोटात गोळा येतो, कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा हल्लाबोल
शेतमालाचे दर वाढले की सरकारच्या पोटात गोळा येतो, कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा हल्लाबोल
Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीत मध्यरात्री हालचालींना वेग, राजेश टोपे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
अंतरवाली सराटीत मध्यरात्री हालचालींना वेग, राजेश टोपे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Weather Update: राज्यात पुन्हा मुसळधार! पुढील 4 दिवस परतीच्या मान्सूनचा फटका, पुण्याला रेड तर बाकी जिल्ह्यात यलो अलर्ट
राज्यात पुन्हा मुसळधार! पुढील 4 दिवस परतीच्या मान्सूनचा फटका, पुण्याला रेड तर बाकी जिल्ह्यात यलो अलर्ट
Uddhav Thackeray : अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का, बडा नेता समर्थकांसह मुंबईकडे रवाना 
उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का, बडा नेता समर्थकांसह मुंबईकडे रवाना, विधानसभाची उमेदवारी मिळणार?  
Embed widget