Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Mumbai City District Planning Committee : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीला वरळीचे आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार की नाहीत? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Mumbai City District Planning Committee : उपमुख्यमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आज (30 जानेवारी) मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीला वरळीचे आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार की नाहीत? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. आज मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक परळीतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये दुपारी एक वाजता होणार आहे. ही बैठक पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिलीच यांची बैठक आहे. त्यामुळे ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला भाजप शिवसेना आणि काँग्रेस आमदार भिडण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष असेल. पालकमंत्रीपदावरून वाद असला, तरी वाद नसलेल्या ठिकाणी पालकमंत्री जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडमध्ये सुद्धा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीकडे सुद्धा लक्ष आहे.
नगरविकास मंत्र्यांवर अन्याय झाल्याचे आम्हाला वाटते
आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर जोरदार टीका केली होती. पत्रकार परिषद घेत त्यांनी या दौऱ्यात स्वाक्षरी केलेल्या 54 सामंजस्य करारांवर प्रश्न उपस्थित केले, त्यापैकी 11 विदेशी कंपन्यांसोबत तर 43 महाराष्ट्रातील कंपन्यांसोबत आहेत. महाराष्ट्रातील कंपन्यांसोबत एवढ्या मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार झाले असताना ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत यापूर्वी का करण्यात आले नाहीत, असा सवाल ठाकरे यांनी केला होता. ते म्हणाले की, जगभरातून कंपन्या आणि मोठे उद्योजक येतात. त्यांना भेटण्याची संधी मिळेल. आम्ही पण गेलो. जेव्हा आमचे सरकार होते. पण महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची आखणी अशा पद्धतीने केली की, महाराष्ट्रातील कंपन्यांसह त्यांचा वेळ वाया गेला. नगरविकास विभाग आणि सिडको यांच्यात 4 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. हे दोन्ही विभाग एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. पण ते दरे गावात बसला होते आणि बाकीचे तिथे MOU करत होते.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, नगरविकास मंत्र्यांवर अन्याय झाल्याचे आम्हाला वाटते आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यांनी नगरविकास विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले, मग एकनाथ शिंदे यांना का घेतले नाही, हे आम्हाला माहीत नाही. त्यांना पास मिळाला, की नाही मिळाला. याबाबत कोणतीही माहिती नाही. आणखी एक बाब समोर आली आहे ती म्हणजे बिल्डर्ससोबत मोठ्या प्रमाणावर एमओयू करण्यात आले आहेत. आता बिल्डरांनी जागा खरेदी केली आहे. काम सुरू होणार आहे, मग त्यांना तिथे घेऊन एमओयू करण्यात काय अर्थ आहे?
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
