Monkeypox : OMG...मंकीपॉक्सचा मेंदूवरही होतोय परिणाम? परदेशात वाढतेय रुग्णसंख्या, तज्ज्ञांनी काय इशारा दिला?
Monkeypox : जगातील काही देशांमध्ये मंकीपॉक्सचा कहर पाहायला मिळतोय. याची रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. हा विषाणू मेंदूच्या कार्यावरही परिणाम करू शकतो. याबाबत तज्ज्ञांनी इशारा दिलाय.
![Monkeypox : OMG...मंकीपॉक्सचा मेंदूवरही होतोय परिणाम? परदेशात वाढतेय रुग्णसंख्या, तज्ज्ञांनी काय इशारा दिला? Monkeypox health lifestyle marathi news Monkeypox also affects the brain The number of patients is increasing abroad experts warn Monkeypox : OMG...मंकीपॉक्सचा मेंदूवरही होतोय परिणाम? परदेशात वाढतेय रुग्णसंख्या, तज्ज्ञांनी काय इशारा दिला?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/05/4cd9fc5449021de9b406903db4b87f831725521464476381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Monkeypox : आधी कोरोना (Corona)..आता मंकीपॉक्स... जगातील काही देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. ज्यामुळे जगभरातील आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढत आहे. मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे, जो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. सहसा हा आजार काही दिवसात बरा होतो, परंतु काही वेळेस तो गंभीर समस्या देखील निर्माण करू शकतो. मात्र याच मंकीपॉक्समुळे मेंदूलाही धोका उद्भवू शकतो का? यावर आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे, काय म्हणतात तज्ज्ञ...
मंकीपॉक्समुळे मेंदूला सूज येते?
मंकीपॉक्समुळे न्यूरोलॉजिकल समस्या देखील उद्भवू शकतात म्हणजेच मेंदूशी संबंधित आजार. त्यामुळे एन्सेफलायटीस, मेंदुज्वर यासारख्या समस्यांचा धोका असतो. यासंदर्भात एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार फोर्टिस रुग्णालयातील डॉ. प्रवीण गुप्ता सांगतात की, मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाची त्वचा और रेस्पिरेटरी ट्रेकवर परिणाम होऊ शकतो. यामुळे न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात. यामुळे एन्सेफलायटीस होण्याचा धोका असतो. या समस्येमुळे मेंदूला सूज येते. त्यामुळे रुग्णाला डोकेदुखी, ताप यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय मेंदुज्वरही होऊ शकतो. यामध्ये रुग्णाच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवतीच्या पडद्याला सूज येऊ लागते. मंकीपॉक्सच्या सुरुवातीला शरीरात ताप येतो आणि पुरळ उठते. यानंतर पुरळ संपूर्ण शरीरात पसरते.
न्यूरोलॉजिकल समस्या का उद्भवतात?
डॉ. गुप्ता यांच्या मते, मंकीपॉक्स विषाणूचा रुग्णाच्या त्वचेवर आणि श्वसनमार्गावर परिणाम होतो, परंतु काही रुग्णांमध्ये हा विषाणू त्यांच्या मज्जासंस्थेवरही गंभीर परिणाम करू शकतो, ज्यामुळे मज्जासंस्था आणि मेंदूच्या पेशींना नुकसान होते. सूज येते. कधीकधी मंकीपॉक्सने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक प्रतिसादामुळे मज्जासंस्थेचे नुकसान होते. तथापि, मंकीपॉक्सच्या न्यूरोलॉजिकल इफेक्टची प्रकरणे कमी आहेत.
मंकीपॉक्स कसा टाळावा?
मंकीपॉक्स रोग जितक्या लवकर ओळखला जाईल, तितक्या लवकर त्यावर नियंत्रण ठेवता येईल. डॉक्टर रुग्णाच्या लक्षणांवर आधारित उपचार करतात. या आजारावर सध्या कोणतीही लस उपलब्ध नसली तरी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने म्हटले आहे की ते लवकरच या आजारावर लस विकसित करू शकतात.
- मंकीपॉक्स टाळण्यासाठी, खोकला किंवा शिंकणाऱ्या लोकांपासून दूर राहा.
- संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका आणि संक्रमित व्यक्तीने वापरलेल्या वस्तू वापरू नका.
- स्वच्छतेची काळजी घ्या
- तापासारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
हेही वाचा>>>
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)