Cancer: कर्करोगाचा धोका तुमच्याच स्वयंपाकघरात? मीठामुळे होतोय पोटाचा कॅन्सर? ही लक्षणं तुम्हाला नाही ना?
Cancer: कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत. नुकत्याच आलेल्या एका संशोधनानुसार जेवणात मीठ खाल्ल्याने देखील कर्करोग होतो. याबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
Cancer: भारतीय जेवणात अनेक अन्नपदार्थ अगदी चवीने खाल्ली जातात. भारतात विविध प्रांताप्रमाणे विविध खाद्यसंस्कृती अवघ्या जगभरात प्रसिद्ध आहे. पण हे पदार्थ चविष्ट बनविण्यामागे एका गोष्टीचा मोठा वाटा असतो. तो म्हणजे मीठ.. पदार्थांमध्ये मीठ नसेल तर त्याची चव चांगली लागत नाही. पण जास्त प्रमाणातही मीठ खाणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. होय, अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, मिठाच्या सेवनाने शरीरावर वाईट परिणाम होतो. नुकत्याच आलेल्या एका संशोधनानुसार जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो आणि कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो. याबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
संशोधन काय म्हणते?
गॅस्ट्रिक कॅन्सर जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, एका संशोधनात जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने कॅन्सर होऊ शकतो याची पुष्टी झाली आहे. या विषयी सविस्तर जाणून घेऊया. हे संशोधन यूकेमधील सुमारे 4,71,144 लोकांवर करण्यात आले. अभ्यासात मिठाचे परिणाम सर्वांमध्ये दिसले, ज्यामध्ये वाईट लक्षणे अधिक दिसली. मिठापासून कर्करोगाचा धोकाही या अभ्यासात दिसून आला आहे. हा कर्करोग मुख्यतः प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे होतो, कारण या पदार्थांमध्ये मीठ जास्त असते. मिठामुळे होणाऱ्या कर्करोगाला गॅस्ट्रिक कॅन्सर म्हणतात.
गॅस्ट्रिक कर्करोग म्हणजे काय?
हा कर्करोगाचा एक प्रकार आहे, जो जगभरात वाढत आहे. दरवर्षी लाखो लोक या कॅन्सरला बळी पडतात आणि आपला जीव गमावतात. गॅस्ट्रिक कॅन्सरमध्ये पोटाच्या आत ट्यूमर पेशी तयार होतात. तसेच चेहऱ्यावर आणि त्वचेवर या गंभीर आजाराची लक्षणेही आपल्याला दिसतात. या प्रकारच्या कर्करोगाला पोटाचा कर्करोग किंवा स्टमक कॅन्सर असेही म्हणतात.
मीठामुळे कर्करोग कसा होतो?
संशोधनानुसार, जास्त मीठ खाल्ल्याने पोटातील आतड्यांवर परिणाम होतो, ज्यामुळे पोटात सूज आणि जळजळ वाढते. ही जळजळ भिंतीवर Helicobacter pylori नावाच्या जीवाणूंचा संसर्ग वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे पोटात जखमा आणि अल्सर होऊ शकतात. हेलिकोबॅक्टर पायलोरी बॅक्टेरिया हे पोटाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण मानले जाते. दुसऱ्या एका अहवालात असे म्हटले आहे की, जगातील दोन तृतीयांश लोक या जीवाणूमुळे विविध आजारांनी ग्रस्त आहेत.
पोटाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे
- अचानक वजन कमी होणे.
- पोटदुखी आणि पेटके.
- भूक न लागणे.
- अन्न गिळण्यात अडचण.
- थकवा.
- थोडेसे अन्न खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते.
- जठरासंबंधी कर्करोग टाळण्यासाठी उपाय
- धुम्रपान टाळा.
- सकस आहार घ्या.
- तंबाखूचे सेवन टाळा.
- पोटात अधिक अल्सर तयार होणे देखील धोकादायक आहे.
- वजन नियंत्रित ठेवा.
हेही वाचा>>>
Cancer Health Tips: आश्चर्यच! कर्करोगाचा पराभव चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यावर करणे शक्य आहे? आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )