(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smoking : धूम्रपानामुळे मेंदूचा आकार कमी होतो, स्मरणशक्तीवरही परिणाम; वेळीच वाईट सवय सोडा
Smoking Can Shrink Your Brain : धूम्रपान करणाऱ्यांचा मेंदू आकुंचित होतो. एका संसोधनानुसार, धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये स्मरणशक्ती लवकर कमी होणे आणि अल्झायमर यासारख्या रोगाचा धोका आहे.
Smoking Causes Brain Shrinkage : धुम्रपान (Smoking) करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, याचा फुफ्फुसांसह (Lungs) मेंदूच्या (Brain) आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. धूम्रपान करणाऱ्यांचा मेंदू आकुंचित होतो. एका संसोधनानुसार, धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींचा मेंदू आकुंचित होतो आणि तो पुन्हा मूळ स्थिती येऊ शकत नाही. एका नवीन संशोधनात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. धूम्रपानामुळे फक्त हृदय आणि फुफ्फुसांवरच परिणाम होत नाही, तर मेंदूवरही कायमस्वरूपी परिणाम होत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, धुम्रपानामुळे मेंदूचा आकार कमी होतो.
धूम्रपान करणाऱ्यांचा मेंदू आकुंचित होतो
वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी एक नवीन संशोधन केलं आहे. या संशोधनानुसार, त्यांनी दावा केला आहे की, धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये स्मरणशक्ती लवकर कमी होणे आणि अल्झायमर यासारख्या रोगाचा धोका आहे. . यामध्ये जीन्स (Genes) ही महत्त्वाची भूमिका बजावतात. ग्लोबल ओपन सायन्स जर्नलमध्ये जीन्स संशोधन प्रकाशित झालं आहे. या संशोधनानुसार, धूम्रपान करणाऱ्यांचा मेंदु आकुंचित होतो आणि तो पुन्हा मूळ आकारात येत नाही. धूम्रपान सोडल्याने मेंदूच्या ऊतींचे अधिक नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते. तरीही मेंदू त्याच्या मूळ आकारात परत येणार नाही.
स्मरणशक्तीवरही परिणाम, वेळीच वाईट सवय सोडा
सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, धूम्रपान करणाऱ्यांना स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका जास्त असतो. याशिवा धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना अल्झायमर रोगाचा धोका जास्त असतो. वयानुसार लोकांच्या मेंदूचा आकार नैसर्गिकरित्या कमी होतो, पण धुम्रपानामुळे मेंदूचा आकार आणखी कमी होतो. तरी धूम्रपानामुळे मेंदू अकाली वृद्ध होण्याचा धोकाही वाढतो.
वेगवेगळ्या वयोगटातील 32,094 लोकांवर संशोधन
या संशोधनादरम्यान विविध वयोगटातील 32,094 लोकांच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात संशोधकांना आढळलं की, धूम्रपान आणि मेंदूचा संबंध धूम्रपानाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. एखादी व्यक्ती जितकी जास्त धूम्रपान करते, तितका त्याच्या मेंदूचा आकार कमी होतो. ई-सिगारेटचा दीर्घकाळ वापर केल्यानेही मेंदूवर वाईट परिणाम होतो.
ई-सिगारेटमुळे श्वसनसंस्थेचे नुकसान
हल्ली तरुणांमध्ये ई-सिगारेटचा वापर वाढला आहे. ई-सिगारेटच्या वाढत्या वापरावर चिंता व्यक्त करताना तज्ज्ञांनी सांगितलं की, त्यात 900 ते 2000 रसायने असतात. हे फुफ्फुसात खोलवर पोहोचतात, त्यामुळे श्वसनसंस्थेला हानी पोहोचते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Lungs Infection : 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात, तुमच्या फुफ्फुसांमध्येही संसर्ग झालाय, हे कसं ओळखाल?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )