Diabetes Symptoms : सावधान! त्वचेचा बदलता रंग असू शकतं मधुमेहाचं लक्षण
Diabetes Symptoms on Skin : शरीरात रक्तातील साखर वाढल्यावर त्वचेवर अनेक प्रकारची लक्षणं दिसू लागतात. त्वचेवर काळे, लाल, पिवळे डाग दिसू शकतात. याकडे दुर्लक्ष केल्यास समस्या वाढू शकते.
Skin Color Change : वाढते वय आणि व्यस्त किंवा चुकीची जीवनशैली यामुळे अनेक लोकांना मधुमेहाची (Diabetes) समस्या उद्भवते. शरीरात रक्तातील साखर वाढल्यावर त्वचेवर अनेक प्रकारची लक्षणं दिसू लागतात. पण अनेक वेळा लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. मात्र असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. मधुमेहाचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो, रक्तातील साखर वाढल्याने हृदय, किडनी संबंधित आणि रक्तदाब यांसारखे आजार होऊ शकतात. मधुमेह असणाऱ्या रुग्णाचे डोळेही कमकुवत होतात. मधुमेहाची लक्षणे त्वचेवरही दिसू लागतात. शरीरात रक्तातील साखर वाढत असल्यास तुमची त्वचा अनेक संकेत देते. मधुमेहाची त्वचेवर दिसणारी लक्षणे जाणून घ्या.
मधुमेह झाल्यास त्वचेवर 'ही' लक्षणे दिसतात
1. तुमच्या शरीरावर काळे डाग दिसू लागल्यास हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.
2. तुमच्या मानेवर किंवा काखेत काळे चट्टे किंवा ठिपके दिसत असतील आणि त्यांना स्पर्श केल्यावर मऊ वाटत असतील तर हे रक्तातील साखर वाढण्याचं लक्षण आहे.
3. वैद्यकीय भाषेत याला 'अॅकॅन्थोसिस निग्रिकन्स' म्हणतात. रक्तातील इन्सुलिन वाढल्याची ही लक्षणे आहेत.
4. मधुमेह झाल्यास त्वचेला खाज येते.
5. जर तुम्हाला खूप मुरुम येत असतील किंवा पुरळ येत असेल तर ही मधुमेहाची लक्षणं आहेत.
6. त्वचेवर पिवळे, लाल किंवा तपकिरी डाग असतील तर ही प्री-डायबिटीजची लक्षणं आहेत. याला 'नेक्रोबायोसिस लिपोडिका' म्हणतात.
7. रक्तातील साखर वाढल्यास जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. त्यामुळे नसा खराब होतात आणि रक्ताभिसरणातही समस्या निर्माण होतात.
8. तुमच्या त्वचेत जास्त कोरडेपणा जाणवत असेल तर हे मधुमेहाचं लक्षण असू शकतं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Covid19 Update : बदलत्या ऋतूत वाढतोय कोरोनाचा धोका! आजार टाळण्यासाठी 'ही' खबरदारी घ्या
- Copper Water : तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर? तुम्ही करु नका 'ही' चूक
- Health Tips : मुलांचं वजन कमी होतंय? मुलं सारखी आजारी पडतायत? 'ही' आहेत यामागची कारणं
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )