(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना काळात लहान मुलांमध्ये 'स्पीच डिले'ची समस्या; 'ही' आहेत कारणं
कोरोना काळात लहान मुलांना बंदिस्त वातावरणात रहावं लागतंय. त्यामुले त्यांच्यामध्ये उशिरा बोलण्याची समस्या निर्माण होत आहे.
मुंबई: कोरोना काळात टाळेबंदीमुळे बंदिस्त वातावरणात लहान मुले वावरत आहेत. त्यामुळे मोकळ्या वातावरणात खेळणे, बागडण्याचे प्रमाण कमी झाल्याचं दिसून येतंय. अनेक मुलं तीन वर्षांची झाली तरी त्यांना अजूनही बोलणं येत नसल्याचं म्हणजे 'स्पीच डिले'ची समस्या निर्माण झाल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं आहे. मागील काही महिन्यांपासून या केसेस मध्ये सुद्धा मोठी वाढ होत आहे.
कोरोना महामारीच्या काळात अनेक लहान मुलांना 'स्पीच डिले' म्हणजेच उशिरा बोलण्याच्या केसेसमध्ये वाढ झाली आहे. यावर बालरोग तज्ज्ञांकडून थेरपीचा अवलंब केला जातोय.
मुलांमध्ये उशिरा बोलण्याचं म्हणजे स्पीच डिलेची समस्या का निर्माण होते?
- बाळाच्या स्पीच आणि लँग्वेज डेव्हलपमेंटमध्ये आसपासचं वातावरण महत्त्वाची भूमिका बजावतं.
- पालकांनी आपल्या लहान मुलांसोबत वेळ घालवणं त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे.
- लहान मुलांसोबत खेळणं, बागडणं कमी झाल्यानं मुलं उशिरा बोलण्याचं प्रमाण वाढतंय.
- वर्क फ्रॉम होम मध्येही पालकांना आपल्या मुलांशी संवाद साधण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही.
साधारणपणे मुलं हे 18 महिन्यांपर्यंत थोडं थोडं बोलायला सुरुवात करतात. मात्र काही मुलांना तीन-साडे तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरसुद्धा अडखळत अडखळत बोलतात. अशावेळी त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन त्यांना बोलायला शिकवणे गरजेचे आहे. या सगळ्यात आपलं मुल योग्य वयात बोलत नसेल किंवा त्याला उशिरा बोलणं येत असेल तर पालकांनी घाबरण्याचे कारण नसून डॉक्टरांच्या सल्ल्याने स्पीच थेरपीद्वारे ही समस्या दूर होऊ शकते. शिवाय, घरच्या घरीसुद्धा आपण मुलांसोबत संवाद साधत राहिलो तरीदेखील मुलं बोलायला लागतील.
जर तुम्ही तुमच्या मुलांशी सातत्याने संवाद साधण्याचा, त्यांना खेळीमेळीचं आणि मोकळे वातावरण देण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या मुलांमध्ये स्पीच डीले, बोलण्यास उशीर होणे किंवा बोलण्यात अडथळा येणे या प्रकारची समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे मोकळे वातावरण देण्याची जबाबदारी ही पालकांची असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला, नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
- Police Recruitment : आगामी पोलीस भरती प्रक्रिया स्वतः गृहखातं राबवणार, सूत्रांची माहिती
- BMC Election: वॉर्डची पुनर्रचना राजकीय गणिताच्या आधारे? नऊ पैकी सहा वार्ड हे शिवसेनेच्या मतदारसंघातील
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )