Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला, नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
Maharashtra Corona Update : राज्यात आज 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.85 टक्के झाला आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 15 हजार 140 नव्या रुग्णांची भर पडली असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 35 हजार 423 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 91 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 91 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 3221 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1682 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 39 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.85 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 73 लाख 67 हजार 259 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.42 टक्के आहे. सध्या राज्यात 11 लाख 74 हजार 825 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2798 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 46 लाख 29 हजार 449 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांची संख्या एक हजारांहून कमी, 1 हजार 837 कोरोनामुक्त
सोमवारी मुंबईत नवे 960 कोरोनाबाधित आढळले असून 1 हजार 837 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 9 हजार 900 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सोमवारी 960 नवे रुग्ण आढळले असून 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 623 झाली आहे. तर मागील 24 तासांत 1 हजार 837 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron in Kids : काळजी घ्या! चिमुकल्यांना ओमायक्रॉनचा अधिक धोका, लागण झालेल्या मुलांमध्ये 'ही' पाच लक्षणे
- India Corona Vaccination : लसीकरणाचा आणखी एक महत्वाचा टप्पा पार, 75 टक्के प्रौढ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण
- महाराष्ट्रात मास्कमुक्ती शक्य आहे की नाही?, टास्क फोर्सने एका वाक्यात सांगितलं!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha