Patanjali : पतंजलीकडून त्यांच्या उत्पादनांद्वारे भारतीय संस्कृती आणि परंपरांना जगभरात पोहोचवण्याचं कार्य, जाणून घ्या
Patanjali : पतंजलीच्या दाव्यानुसार कंपनी योग आणि आयुर्वेदाला जागतिक स्थरावर पोहोचवत आहे. कंपनी स्वदेश आणि आत्मनिर्भर भारताचा संदेश पोहोचवत आहे, त्यामुळं निर्यातीत वाढ झाली.

पतंजलीच्या दाव्यानुसार भारतीय संस्कृतीचे प्रतीक योग आणि आयुर्वेदाला जागतिक मंचावर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात पतंजली आयुर्वेदाचं योगदान महत्त्वाचं आहे. पंतजलीनं आरोग्य उत्पदानांच्या माध्यमातून सांस्कृतिक जागरणाबरोबर भारतीय मूल्य ज्यामध्ये अध्यात्मिकता, स्वावलंबन आणि प्राकृतिक चिकिस्तेला जगभरात पोहोचवलं आहे. पतंजलीच्या दाव्यानुसार कंपनी स्वदेश आणि आत्मनिर्भर भारताचा संदेश उत्पादनांसोबत जोडून एक क्रांती करत आहे.
पतंजलीनं म्हटलं की कंपनी त्यांची अनोखी भूमिका बहुआयामी रणनीतीद्वारे बजावत आहे. प्राचीन आयुर्वेदिक परंपरांचं पुनरुज्जीवन करणे आणि हर्बल उत्पादनं ज्यामध्ये दंतकांती, दिव्य फार्मसीची औषधे आणि योग चिकित्सा लोकांना एका समग्र निरोगी आरोग्याकडे नेत आहे. दुसरीकडे स्मावी रामदेव यांच्या नेतृत्त्वात आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं जागतिक आयोजन योगाला अध्यात्मिक वारसा म्हणून प्रस्थापित करत आहेत. पतंजली गुरुकुल प्राचीन ज्ञानाला संरक्षित करत आहे. सोबत सनातन धर्माचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवत आहे.
यूरोप आशियातील देशांमध्ये उत्पादनं उपलब्ध : पतंजली
पतंजलीच्या दाव्यानुसार जागतिक पातळीवरील पोहोचण्याबाबत म्हटलं तर पतंजलीची उत्पादनं अमेरिका, यूरोप, ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडातील देशात उपलब्ध आहेत. जिथं अनिवासी भारतीय ग्राहकांसह पाश्चिमात्य ग्राहक आयुर्वेदाकडे वळत आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालात 2025 मध्ये निर्यात 30 टक्क्यांनी वाढली आहे. पतंजलीच्या दाव्यानुसार ते स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबूत करत आमच्या उत्पादनांमुळं विदेशावरील अवलंबन कमी होत आहे.
नफा मिळवण्यासह सामाजिक कामावर भर
पतंजलीच्या दाव्यानुसार, आम्ही नफा मिळवण्यासह सामाजिक सेवेवर जोर देत आहे. मोफत आरोग्य शिबीर, ग्रामीण आरोग्य केंद्र, सांस्कृतिक उत्सवासह भारतीय मूल्यांना जीवंत करते. न्यूयॉर्क, लंडनमध्ये योग केंद्रातून लोकांना आरोग्य हेच धन असल्याचा मंत्र शिकवत आहे. या भूमिकेमुळं आर्थिक स्थिरता मिळतेच त्यासह पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये भारतीय परपरांना पुन्हा स्थापित करत आहे.
भारतीय मूल्यांना मजबूत करणार
तज्ज्ञांच्या मते पतंजलीनं आयुर्वेदाला सॉफ्ट पॉवर म्हणून पुन्हा स्थापित केलं आहे. जागतिक महामारीनंतर आरोग्याबाबत जागृती वाढवण्यात फायदेशीर ठरला आहे. आव्हानं देखील पंतजलीसमोर आहेत. जागितक स्पर्धा आणि नियामक अडचणी असल्या तरी पतंजलीचा संकल्प अटळ आहे. येत्या वर्षांमध्ये पतंजली भारतीय मूल्यांना आणखी मजबूत करेल. जिथं योग आणि आयुर्वेद केवळ आरोग्याचं साधन नसेल तर ते सास्कृतिक धागा देखील असेल.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
























