Omicron Variant : कोरोनाला हलक्यात घेताय? ती चूक करू नका; आहारात करा 'हे' बदल
Health Tips : ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यास घसा खवखवणे, अंगदुखी, ताप येणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आहारात काही बदल केले पाहिजेत.
Covid-19 : ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यास घसा खवखवणे, अंगदुखी, ताप येणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आहारात काही बदल केले पाहिजेत. कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात व्हाईट ब्रेड, बीयर, सोडायुक्त पेय, जंक फूडचे सेवन करू नये.
ओमायक्रॉन व्हेरियंटमधून (Omicron Variant) बरे झाल्यानंतरही रुग्णांमध्ये अशक्तपणासारखी लक्षणे पाच ते आठ दिवस दिसतात. त्यामुळे कोविड-19 मधून बरे झाल्यानंतरही तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
- घसा खवखवायला लागला तर लगेच थंड पाणी पिणे बंद करा. त्याऐवजी कोमट पाणी प्यावे.
- कोमट पाणी चहासारखे प्यावे. असे केल्याने घशाला आराम मिळतो.
- खूप गरम पाणी प्यायल्यानंतर खोकला सुरू झाला किंवा घशात कोरडेपणा जाणवत असेल तर पाण्यात थोडी साखर किंवा ब्राऊन शुगर मिसळून प्या.
- दूध आवडत नसले तरी रात्री झोपण्यापूर्वी कोमट हळदीचे दूध प्यावे.
- रात्रीचे जेवण आठ वाजण्यापूर्वी करावे. त्यानंतर दोन तासांनी हळदीचे दूध प्यावे.
- आहारातून आंबट आणि मसालेदार पदार्थ काढून टाका. पण टोमॅटो, संत्री आणि लिंबूचे सेवन करावे.
- दररोज जेवणात आणि नाश्त्यामध्ये गूळ, चिक्की आणि ड्रायफ्रुट्सचे सेवन करावे. यामुळे शरीर उबदार राहते.
- डाळिंबामध्ये अॅन्टीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. डाळिंबाचा ज्यूस शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतो. तसेच आजारांपासून दूर ठेवण्यासाठीही मदत करतो. त्यामुळे आहारात डाळिंबाचादेखील समावेश करावा.
- पाणी सर्व प्रकारच्या रोगांवर रामबाण उपाय म्हणून काम करते. त्याच वेळी, ओमायक्रॉन टाळण्यासाठी अधिक पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. अधिक पाणी प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत होते.
- व्हिटॅमिन सी आणि झिंक असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. यासाठी तुम्ही लसूण, आले, गरम मसाला, हळद, मध, तुळस, संत्री, लिंबू इत्यादींचे सेवन करू शकता.
- शेंगदाणे, बदाम, अक्रोड, काळे खजूर खाल्ल्यासही रोगप्रतिकार शक्ती वाढते. सुकामेव्यातही प्रथिने, क्षार, फॅटी अॅसिड असतात. सोबतच आहारामध्ये दही, लिंबू पाणी, लसूण चटणीचा समावेश करावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Winter Tips : कोरोनात सर्दीपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Omicron Corona : कोरोना किंवा फ्लू नंतर कोरडा खोकला दूर करण्यासाठी 'हे' पाच उपाय करा, नक्की फरक जाणवेल
Covid 19 : कोरोनाला दूर ठेवायचंय मग ‘या’ पदार्थांपासून दूर रहा, थेट इम्युनिटीवर होईल परिणाम!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )