(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dengue Day 2024 : डास, माश्यांमुळे झालात हैराण! 'ही' झाडे लावून डेंग्यू, मलेरियासारखे आजार दूर पळवा, घराचं सौंदर्य वाढवा
Dengue Day 2024 : जर तुम्हीही तुमच्या घरातील डास आणि माश्यांमुळे हैराण असाल तर या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही झाडे उपयुक्त ठरू शकतात.
Dengue Day 2024 : आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस.. दरवर्षी 16 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करणे हा आहे. जर तुम्हीही तुमच्या घरातील डास आणि माश्यांमुळे हैराण असाल तर या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही झाडे उपयुक्त ठरू शकतात. स्प्रे किंवा क्रीमचीही गरज भासणार नाही. याशिवाय घराचे सौंदर्यही वाढेल. घरामध्ये काही विशेष रोपं लावून तुम्ही डासांच्या दहशतीपासून मुक्त होऊ शकता.
घरात 'ही' झाडे लावून तुम्ही डासांपासून मुक्ती मिळवू शकता.
उन्हाळ्यात मच्छर, घरमाशी आणि डासांचे प्रमाण वाढल्याने त्यांची दहशत वाढते. तर या लहान दिसणाऱ्या डासांमुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे घातक आजार होऊ शकतात. त्यामुळे त्यांचा वेळीच नायनाट करणे महत्त्वाचे आहे. डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध असली तरी त्यातील अनेक प्रॉडक्ट आरोग्याला हानी पोहोचवतात. त्यामुळे डासांवर फारसा परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत डासांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक गोष्टींची मदत घेऊ शकता. काही विशेष प्रकारची झाडे डासांपासून दूर राहण्यासाठी खूप प्रभावी आहेत.
गवती चहा
गवती चहाला थोडा उग्र वास असतो, ज्यामुळे डास पळून जातात. घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीजवळ ठेवा. हे अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. वनस्पती व्यतिरिक्त, लेमनग्रास तेल देखील डास दूर करण्यासाठी प्रभावी आहे. यामध्ये लिमोनेन आणि सिट्रोनेला सारखे घटक असतात जे डासांना दूर ठेवतात. लेमनग्रास रोपे थेट जमिनीत लावता येतात. ते सूर्यप्रकाशात चांगले वाढते. यासाठी, चिकणमाती, कंपोस्ट आणि वाळू असलेली मातीची रचना योग्य आहे. ते लहान भांड्यात लावू नका कारण यामुळे त्याची वाढ होत नाही.
झेंडू
झेंडूची फुले तुमच्या घराच्या बाल्कनीचे सौंदर्य तर वाढवतातच पण ते डास आणि इतर कीटकांनाही दूर ठेवतात. या वनस्पतीतून येणारा वास हा पायरेथ्रम, सॅपोनिन, स्कोपोलेटिन, कॅडिनॉल आणि इतर घटकांनी बनलेला असतो, जे डासांना तुमच्या घरापासून दूर ठेवतात.
तुळशीचे रोप
तुळशीचे रोप देखील डासांना दूर करते. त्याच्या वासामुळे डास जवळपास येत नाहीत. यावर आणखी एक उपाय म्हणजे दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवावे. तुळशीची काही पाने धुवून त्यात टाका. गॅस बंद करा आणि हे उकळलेले पाणी बाजूला ठेवा. तीस ते चार तासांनंतर पाने पाण्यापासून वेगळी करा. आता एका स्प्रे बाटलीत ठेवा. संध्याकाळी बाहेर जाण्यापूर्वी हे पाणी हात, मान आणि पायावर फवारावे. यामुळे डास आणि इतर कीटक तुमच्या जवळपास फिरणार नाही
लॅव्हेंडर
लॅव्हेंडर वनस्पती माश्या, डास, कोळी आणि मुंग्यांना दूर ठेवण्याचे काम करते. सुवासिक सुगंधी वनस्पती देखील खूप सुंदर दिसते. या वनस्पतींचा उपयोग अरोमाथेरपी आणि हर्बल उपचारांसाठी केला जातो. या वनस्पतीची पाने थेट त्वचेवर देखील चोळता येतात. याच्या पानांमधून निघणारे तेल तुमचे कीटकांपासून संरक्षण करते.
रोजमॅरी
ही एक सुंदर आणि सुगंधी वनस्पती आहे. त्याची पाने पातळ व तीक्ष्ण असतात. उन्हाळ्यात फुलणाऱ्या या वनस्पतीच्या देठाच्या सुगंधामुळे डास जवळ येत नाहीत. डासांपासून घर सुरक्षित ठेवण्यासाठी घरात रोजमॅरीचे रोप लावा.
हेही वाचा>>>
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )