Men Health: पुरुषांनो ऐकलं का? वडील होण्यात येतोय अडथळा, केवळ 'या' व्हिटॅमिनची कमतरता? तज्ज्ञ काय सांगतात..
Men Health: तुम्हाला माहितीय का? पुरुषांमध्ये 'या' एका व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे त्यांचे वडील होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यापासून रोखू शकते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या...
Men Health: आजकालचं जग हे किती धावपळीचं आहे, हे सर्वांनाच माहितीय. जो तो या स्पर्धात्मक युगात धावतोय. अनेक जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता पुरुष मंडळी आपल्या आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष करताना दिसतात. ज्याचा गंभीर परिणाम त्यांचे मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर होताना दिसतोय. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, शरीरात कोणत्याही आवश्यक घटकाची कमतरता असल्यास ते तुमचे आरोग्य बिघडवू शकते. पण तुम्हाला माहितीय का? पुरुषांमध्ये या एका व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे त्यांचे वडील होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यापासून रोखू शकते? जाणून घ्या...
'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पुरुषांनाही खूप नुकसान होते?
आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे जीवनसत्त्व म्हणजे व्हिटॅमिन बी-12.. हे आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहे, याबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले आणि वाचले असेल. या घटकाच्या कमतरतेमुळे शरीरात ॲनिमिया होऊ शकतो. स्नायू, हाडे आणि सांधे दुखून अशक्तपणा येऊ शकतो. हा घटक आपल्या एकूण आरोग्यासाठी आवश्यक घटक आहे. त्याच्या कमतरतेमुळे केस गळतात आणि साध्या गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास होतो. पण तुम्हाला माहित आहे का की या घटकाच्या कमतरतेमुळे पुरुषांनाही खूप नुकसान होते? होय, जर एखाद्या पुरुषामध्ये व्हिटॅमिन बी-12 कमी झाले तर त्याच्यामध्ये प्रजनन समस्या निर्माण होऊ शकते. याबद्दल जाणून घ्या..
तज्ज्ञ काय सांगतात?
आरोग्य तज्ज्ञ सांगतात, वंध्यत्व म्हणजेच मूल न होणे ही एक वाढती समस्या आहे, जी पुरुषांना प्रभावित करते. पुरुषांमध्ये आढळणारी ही अशी समस्या आहे, ज्यामुळे प्रश्न पडतो की, शरीरात एक व्हिटॅमिन देखील कमी झाले तर त्यांचे किती नुकसान होते. न्यूज मेडिकल डॉट नेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, व्हिटॅमिन बी-12 पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन वाढवते. जर त्यांच्यात या घटकाची कमतरता असेल तर त्याचा त्यांच्या कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. अहवालात असेही म्हटले आहे की, उत्तर अमेरिकेतील 30% जोडप्यांमध्ये या समस्येचे कारण व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता आहे. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये हार्मोनल असंतुलन देखील वाढते.
याचे कारण काय आहे?
एका संशोधनानुसार, पुरुषांमध्ये या जीवनसत्त्वाच्या कमतरतेची मुख्य कारणे म्हणजे धूम्रपान, दारूचे अनियमित सेवन, अस्वास्थ्यकर आहार, आहारात लोहाची कमतरता आणि आनुवंशिकता.
व्हिटॅमिन बी -12 ची पातळी कशी वाढवायची?
संशोधनानुसार, जर एखाद्याच्या शरीरात व्हिटॅमिन बी-12 खूप कमी असेल तर त्याला त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याच वेळी, आवश्यक असल्यास, आपण त्याच्या पूरक आणि इंजेक्शन्सची मदत घेऊ शकता. खाण्यापिण्याच्या साहाय्याने व्हिटॅमिन बी-12 वाढवण्यासाठी सफरचंद, बीट्स, ब्रोकोली, पालक, चिया सीड्स, फ्लेक्स सीड्स, मासे आणि सर्व दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
ही बातमी वाचा :
Women Health: महिलांनो सावधान! भारतातील महिलांना 'या' कॅन्सरचा सर्वाधिक धोका? सुरूवातीची 'ही' लक्षणं तुम्हाला नाही ना?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )