(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Railway : ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसलेल्या तरुणाचा धक्कादायक पद्धतीने मृत्यू, 300 किमीचा प्रवास; नेमकं काय घडलं?
Madhya Pradesh News : ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसलेल्या तरुणाला जागीच मृत्यू झाला. 300 किमी प्रवास संपेपर्यंत शेजारील प्रवाशांना याची कल्पनाच नव्हती. नेमकं काय घडलं, जाणून घ्या.
Bhopal News : ट्रेनचा (Train) प्रवास सोयीस्कर आणि तितकाच परवडणारा मानला जातो. अनेक जण ट्रेनने प्रवास करतात. ट्रेनने भटकंती करताना प्रवासादरम्यानचे (Railway Journey) किस्से आपल्या खास लक्षात राहतात. यातील काही चांगले तर काही वाईट असतात. मध्य प्रदेशातील एका ट्रेनमध्ये अशीच अशी धक्कादायक घटना घडली आहे, जी या बोगीतील प्रवासी आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. तुम्ही ट्रेनने प्रवास करत आहात आणि बाजूच्या सीटवर एखादा मृतदेह असेल तर, तुम्हाला धक्का बसेल ना? असंच काहीस मध्य प्रदेशात घडलं. ट्रेनमध्ये जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे 300 किमीचा प्रवास पूर्ण होईपर्यंत इतर प्रवाशांना कल्पनाच नव्हती की, आपल्या सहप्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू
बैतूल येथील रहिवासी असलेला तरुण जनरल बोगीच्या सिंगल विंडो सीटवर बसला होता. सहप्रवाशांना वाटलं की, हा व्यक्ती झोपला आहे. पण, ट्रेनने बरेच अंतर कापल्यानंतर आजूबाजूच्या प्रवाशांना काहीतरी आलबेल असल्याचं लक्षात आलं. त्यांनी पाहिलं असता, तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आणि त्यांच्या पायाखाली जणू जमीनचं सरकली.
300 किलोमीटरचा प्रवास
मध्य प्रदेशच्या बैतूल येथे राहणारा तरुण ट्रेनच्या जनरल डब्यातून विंडो सीटवरून प्रवास करत होता. या प्रवासातच त्याचा थंडीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रवासादरम्यान, या तरुणाचा मृतदेह सीटवरच पडून होता. थंडीमुळे या तरुणाचा सीटवर बसूनच मृत्यू झाला, मात्र शेजारी बसलेल्या प्रवाशांना कळलंच नाही. लोकांना वाटलं की, हा प्रवासी सीटवर बसून झोपला आहे. ट्रेनने सुमारे 303 किलोमीटरचे अंतर कापलं, तेव्हा शेजारील सीटवर बसलेल्या प्रवाशांच्या मनात संशय आला. ट्रेन इटारसीहून ट्रेन दमोहला पोहोचली तेव्हा तरुणाची कोणतीही हालचाल दिसत नव्हती, कानात इअरफोन लावलेला होता.
मृत्यू झाल्याचं कुणालाच कळलं नाही
बऱ्याच वेळानंतर बोगीतील इतर प्रवाशांना या युवकाचा मृत्यू झाल्याचं समजलं , यानंतर त्यांनी रेल्वे कंट्रोलला फोन करून माहिती दिली. त्यानंतर सोमवारी सकाळी नऊ वाजता ट्रेन दमोह स्थानकात आल्यानंतर तरुणाचा मृतदेह रेल्वेतून बाहेर काढण्यात आला. तरुणाकडील तिकीटावरून माहिती मिळाली की, तो बैतूलहून ट्रेनने प्रवास करत होता, पण प्रवासादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, थंडीमुळे हदयविकाराचा झटका आल्याने या तरुणाचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
जीआरपीने मृत युवकाजवळ सापडलेल्या फोनवरून त्याच्या कुटुंबियांशी संपर्क करुन त्यांना या दुख:द घटनेची माहिती दिली आणि कुटुंबात शोकाकुल वातावरण पसरलं. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तरुण एसी कंपनीमध्ये कामाला होता. कामानिमित्त तो छनेरा येथे गेला होता आणि तेथून ट्रेनने प्रवास करत घरी परतत होता. प्रवासादरम्यान त्याने कुटुंबियाशी फोनवरून संभाषणही केलं होतं. पण, हे संभाषण त्याचं अखेरचं ठरलं. विंडो सीटवर बसलेल्या या युवकाचा थंडीमुळे हार्ट अटॅक येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबियांनी दमोह स्थानकालकून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )