(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : वारंवार तोंडात अल्सर येताहेत? मग हे घरगुती उपाय करुन बघा
Health Updates mouth ulcers : तोंडात येणारे फोड फारच त्रासदायक असतात. अनेक कारणांमुळे तोंडाच्या आतील भागात फोड येऊ शकतात. यावरील काही घरगुती उपाय जाणून घेऊयात...
Health Updates mouth ulcers : आपल्या तोंडामध्ये अल्सर (Mouth Blisters) आले असतील तर आपल्या खाण्यावर देखील काहीशे निर्बंध येतात. तोंडात येणारे फोड फारच त्रासदायक असतात. अनेक कारणांमुळे तोंडाच्या आतील भागात फोड येऊ शकतात. बऱ्याच वेळी पोट साफ नसल्याने, संप्रेरकांचं संतुलन बिघडल्यामुळे, जखम झाल्यास, महिलांना मासिक पाळी किंवा कॉस्मेटिक सर्जरीमुळे तोंडात फोड येऊ शकतात.
या अल्सरचा त्रास भयंकर असतो. या त्रासामुळं अनेकदा खाणं पिणं देखील टाळावं लागतं. तोंडाचे फोड बरे करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या औषधं उपलब्ध आहे. पण काही वेळा या औषधांचा चुकीचा परिणामही होती. त्यामुळे अशावेळी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
घरच्या घरी हे पाच उपाय करुन पाहा
1. लसूण
तोंडात येणाऱ्या फोड्यांच्या इलाजासाठी लसूण अतिशय उपयोगी आहे. दोन ते तीन लसूणाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवावी. ही पेस्ट फोड आलेल्या जागेवर लावावी. त्यानंतर 15 मिनिटांनी ती पेस्ट धुवावी. लसणात असलेल्या अँटी-बायोटिक गुणांमध्ये फोड्या लवकर बऱ्या होतात.
2. टी ट्री ऑयल
टी ट्री ऑईलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. फोड्यांवर हे तेल लावल्यास फरक पडतो. एका दिवसातून तीन ते चार वेळा फोड्या असलेल्या भागावर लावल्यास आराम मिळतो.
3. बर्फाचा वापर
फोड्यांवर थंड पदार्थ ठेवल्याने फायदा होता. त्याठिकाणी बर्फ लावण्यास वेदना आणि सूज कमी होते.
4. दुधाचा वापर
दुधामध्ये कॅल्शियम असतं, जे फोड्यांच्या व्हायरसोबत लढण्याचं काम करतं. शिवाय कॅल्शियममुळे झीजही लवकर भरण्यास मदत होते. कापूस थंड दुधात भिजवून फोड्यांच्या ठिकाणी लावावं.
5. कोरफड
फोड्यांवर कोरफड लावल्यास जळजळ कमी होते. त्याचसोबत कोरफडमध्ये असलेले रासायनिक पदार्थ जखम भरण्यास मदत करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )