(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health : 'या' आयुर्वेदिक औषधी करतील शारीरिक दुर्बलेवर मात, अनेक रोगांवर प्रभावी
Health Tips : अशक्तपणा दूर करून, तुम्ही दिवसभर पूर्ण ऊर्जा राखू शकता. शारीरिक दुर्बलता दूर करण्यासाठी उपाय काय आहेत हे जाणून घ्या.
Health Tips : अनेक वेळा आपल्याला थकवा जाणवतो. थकवा येण्याची अनेक कारणं आहेत, ज्यामध्ये पहिलं कारण म्हणजे शरीरातील पोषकतत्वांची कमतरता आणि दुसरं म्हणजे रक्ताची कमतरता. यासोबतच ऑक्सिजनचा प्रवाह कमी होणे किंवा शरीराला गरजेनुसार ऑक्सिजन न मिळणे यामुळेही सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
जेव्हा शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह योग्य प्रकारे होत नाही, तेव्हा शरीरात जडपणा, श्वसन प्रणालीमध्ये समस्या, अंतर्गत सूज, श्वासोच्छवास यांसारख्या अनेक समस्या उद्भवू लागतात. आता अशा परिस्थितीत शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह कसा वाढवायचा, असा प्रश्न पडतो, तर उत्तर आहे तुमची श्वसनसंस्था मजबूत आणि निरोगी बनवून.
या आयुर्वेदिक औषधी ठरतील प्रभावी
- आवळा पावडर
- ज्येष्ठमध पावडर
- द्राक्षारिष्ट सिरप
आवळा पावडर
आवळा पावडर सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने तुमची श्वसनसंस्था आणि पचनसंस्था दोन्ही मजबूत होतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा आवळा पावडर मिसळून घ्या आणि सकाळी अनोशेपोटी हे पाणी प्या.
ज्येष्ठमध पावडर
खोकला दूर करण्यासाठी, कफ नियंत्रित करण्यासाठी आणि श्वसन प्रणाली मजबूत करण्यासाठी ज्येष्ठमध हे एक अतिशय प्रभावी औषध आहे. जेवणानंतर दिवसातून दोन वेळा मधासोबत मिसळून याचे सेवन करू शकता. पाव चमचा ज्येष्ठमध पावडर मधात मिसळा आणि ते मिश्रण हळूवार चाटून खा.
द्राक्षारिष्ट सिरप
द्राक्षांपासून बनवलेल्या औषधाला द्ररिष्ट म्हणतात कारण या टॉनिकमध्ये द्राक्षाचा रस मुख्य घटक म्हणून वापरला जातो. द्राक्षारिष्ठ हे श्वसनसंस्था मजबूत करण्यासाठी तसेच शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी एक उत्तम औषध आहे. शरीरातील रक्त वाढवून रक्त शुद्ध करण्याचेही काम करते. अशक्तपणाच्या बाबतीत या औषधाच्या सेवनाने विशेष फायदा होतो. याचे सेवन कसे करावे याबद्दल तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचा डोस आणि सेवन पद्धत त्याच्या शारीरिक गरजेनुसार वेगळी असते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या :
- Health Tips : 'हा' आजार असलेल्यांनी चुकूनही करू नये शेंगदाण्यांचे सेवन; आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
- Amla benefits : सुपरफूड अशा आवळ्याचे 'हे' गुणधर्म आणि वापरण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे का?
- Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात सामील करा स्प्राउट्स, आरोग्यालाही होतील अनेक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )