Health Tips : मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी योग्य आहार कसा घ्यावा? वाचा डॉक्टरांचा सल्ला
Health Tips : मॅरेथॉनदरम्यान पोषण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे
Health Tips : तुम्हाला मॅरेथॉनमध्ये धावावंसं वाटतं का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅरेथॉनमध्ये जिंकावंसं वाटतं का? मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्याचा अनुभव अत्यंत लाभदायी असू शकतो, पण सहभाग घेण्याबरोबरच तुम्ही अधिक मेहनत घेणं देखील महत्त्वाचं आहे. मॅरेथॉनच्या काही आठवड्यां अगोदरपासून मॅरेथॉन प्रशिक्षणानुसार आरोग्यदायी आहार सहभाग घेण्याचे नियोजन करताना प्रमुख घटक आहे.
आहारापासून शर्यतीच्या दिवशी पोषणावर लक्ष केंद्रित करण्याबाबत अॅबॉटच्या न्यूट्रिशन व्यवसायामधील मेडिकल अॅण्ड सायण्टिफिक अफेअर्सचे प्रमुख डॉ. इरफान शेख तुम्हाला 42 किमी अंतर धावण्याच्या तयारीबाबत माहित असावे अशा सर्व गोष्टींबाबत सांगत आहेत.
तुम्ही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा निर्धार केल्यानंतर रनिंगसाठी प्रशिक्षण नियोजन करणे आवश्यक आहे, तसेच योग्य पोषणाचे नियोजन करणे देखील आवश्यक आहे. तयारीदरम्यान पोषण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचा प्रशिक्षणासाठी शारीरिक क्षमतेवर अनुकूल परिणाम होऊ शकतो.
मॅरेथॉन प्रशिक्षणा दरम्यान 'या' गोष्टी महत्त्वाच्या
ब्रेकफास्ट : अंडी, संपूर्ण गव्हाचे टोस्ट, अर्धा एवोकॅडो आणि केळी
सकाळचा नाश्ता : पीनट बटरसह सफरचंद
दुपारचे जेवण : काळ्या बीन्स, चिकन, वेगवेगळ्या भाज्या, साल्सा आणि चीज असलेले क्विनोआ
प्री-रन स्नॅक : बेरीसह ग्रीक दही आणि कमी मेदयुक्त ग्रॅनोला
पोस्ट-रन डिनर : सॅल्मन, ब्राऊन राइस, बटरसह ब्रोकोली
झोपण्याच्या वेळेचा नाश्ता : दूध, व्होल-ग्रेन सेरेल आणि बेरी
तुम्ही शाकाहारी असाल तर शरीराला आवश्यक प्रथिनांची पूर्तता करण्यासाठी आहार नियोजनामध्ये दही, अंबाडीच्या बिया, कॉटेज चीज, मसूर, शेंगा, सोया मिल्क, एवोकॅडो, स्वीट कॉर्न, बीन्स, मटार, ओट्स आणि नट यांचा समावेश करू शकता.
तुम्ही तुमच्या आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग म्हणून एन्शुअर एचएमबी सारख्या पौष्टिक सप्लीमेंट्सचा अवलंब करू शकता, ज्यामुळे कोणतेही अंतर पार करण्यास मदत होण्यासोबत संपूर्ण पोषण मिळण्याची खात्री मिळू शकते. यामुळे मॅरेथॉनसाठी तयारी करताना शक्तिशाली आणि सक्रिय राहण्यास मदत होण्याकरिता हाडांना आणि स्नायूंना शक्ती मिळू शकते. हे नियोजन सुरळीत होण्यासाठी तुमचा आहार आणि नित्यक्रमामध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील महत्त्वाचे आहे.
अनारोग्यकारक आहाराची निवड करणे किंवा नित्यक्रमामध्ये अवास्तव बदल करण्याचा प्रयत्न करणे याचा तुमच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी अगोदरच रेस-डे नियोजन करा. काही दिवस अगोदर आवश्यक असलेल्या गोष्टींचे नियोजन करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी विसरणार नाही. शेवटचे म्हणजे हायड्रेशन, जलद कार्य करणाऱ्या कर्बोदकांवर लक्ष केंद्रित करा आणि एकाच वेळी 42 किमी अंतर धावण्यास मदत होण्यासाठी पुरेशा प्रमाणात कॅलरींचे सेवन करा.
प्रशिक्षण व शर्यतीच्या दिवशी प्रबळ पोषण नियोजनाचे पालन केल्यास प्रशिक्षण सुलभ होण्यास मदत होईल, तसेच यंदा आणि भविष्यात मॅरेथॉन ध्येये गाठता येतील.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )