Health Tips For Running a Marathon : मॅरेथॉनची तयारी करताय? मग धावण्याआधी 'अशी' वाढवा रोगप्रतिकारशक्ती
Health Tips For Running a Marathon : मॅरेथॉनमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता धावल्यामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. बरेच लोक त्यांच्या फिटनेस पातळीची चाचणी घेण्यासाठी देखील मेरेथॉनमध्ये सहभागी होतात.
Health Tips For Running a Marathon : आता थंडीच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात. दरवर्षी हजारो नागरिक उस्फुर्तपणे मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. मॅरेथॉनमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता धावल्यामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. बरेच लोक त्यांच्या फिटनेस पातळीची चाचणी घेण्यासाठी देखील मेरेथॉनमध्ये सहभागी होतात. तरुणांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकही या शर्यतीत उत्साहाने सहभागी होत असल्याचे पहायला मिळते. त्यापूर्वी मात्र तुमची प्रतिकारशक्ती कशी वाढविता येईल याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढविणे का गरजेचे
धावण्यामध्ये प्रतिकारशक्ती महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या शरीराचे संक्रमणांपासून संरक्षण करणे आणि आपल्याला निरोगी ठेवण्यास रोगप्रतिकारशक्ती मदत करते. लांब पल्ल्याच्या शर्यतीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तात्पुरती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे धावपटू आजारांना बळी पडतात. याचे कारण असे की तीव्र शारीरिक हालचाली शरीरावर अतिरिक्त ताण निर्माण करतात. त्यामुळे, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आवश्यक आहे असे 'अपोलो स्पेक्ट्रा'मधील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. छाया वाजा यांनी सांगितले.
>> असा करा उपाय
> प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त संतुलित आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे. भरपूर फळे आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करा, त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत होऊ शकते. याव्यतिरिक्त, आपल्या आहारात प्रोबायोटिक्स समाविष्ट केल्याने आतड्याच्या आरोग्यास चालना मिळते, जी संपूर्ण प्रतिकारशक्तीशी संबंधित आहे.
> पोषणाव्यतिरिक्त तणाव पातळीचे व्यवस्थापन करणे देखील आवश्यक आहे. उच्च ताणतणावामुळे शरीराची संक्रमणांशी लढण्याची क्षमता कमी होऊ शकते, म्हणून मेडिटेशन, योगसाधना किंवा छंद जोपासून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. याचा आपल्या प्रतिकारशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो.
> एक मजबूत रोगप्रतिकारक प्रणाली राखण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. रात्री 7-8 तासांची झोपेचे घ्यावी. जेणेकरून तुमच्या शरीराला पुरेशी विश्रांती तसेच धावण्यासाठी आवश्यक ऊर्जा आणि लवचिकता मिळेल.
> ध्यानधारणा, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि नियमित शारीरिक हालचाली यासारख्या सरावांमध्ये गुंतल्याने तणावाची पातळी कमी होण्यास मदत होते, एकूणच रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि शरीराचे कार्य सुरळीत राखण्यास मदत होते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )