(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वाढतं वजन झटपट कमी करण्यासाठी घ्या 'Alkaline Diet'; शरीरासाठी फायदेच फायदे
Alkaline Diet : वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आजकाल अनेक प्रकारचे डाएट प्लॅन ट्रेंडमध्ये आहेत. त्यापैकी एक Alkaline Diet आहे. या डाएटबद्दल असा दावा केला जातो की, हे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतं.
Alkaline Diet : धकाधकीचं आयुष्य आणि बदललेली जीवनशैली यांमुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच हेल्दी खाद्यपदार्थांऐवजी बऱ्याचदा आपण जंक फूड किवा अनहेल्दी पदार्थांचं वारेमाप सेवन करतो. यामुळे अनेक समस्यांसोबतच वाढलेल्या वजनाचाही सामना करावा लागतो. अचानक वाढलेल्या वजनामुळे शरीराच्या इतरही समस्या उद्भवतात. अशातच झटपट वजन कमी करण्यासाठी (Wight Loss) मग बाजारातील औषधांचा आधार घेतला जातो. पण त्याऐवजी जर तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवलं आणि व्यायाम केला, तर तुम्ही घरच्या घरी अगदी सहज झटपट वजन कमी करु शकता. यासाठी अल्कलाईन डाएट अत्यंत फायदेशीर ठरतं.
अल्कलाईन डाएट म्हणजे नेमकं काय?
शरीराचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेक पोषक घटकांसोबतच शरीरातील पीएच लेव्हलही स्थिर असणं गरजेचं असतं. जर शरीरातील पीएच लेव्हल स्थिर नसेल तर आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शरीरामध्ये पीएच लेव्हल सामान्य ठेवण्यासाठी तुमचा आहार योग्य असणं अत्यंत गरजेचं असतं. अशावेळी अल्कलाईन डाएट म्हणजेच, क्षारयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं.
अल्कलाईन डाएट का आवश्यक?
अल्कलाईन डाएटमध्ये, प्रामुख्यानं आल्माऐवजी क्षार तयार करणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो. अल्काइन डाएट घेतल्यानं शरीरातील pH लेव्हल संतुलित राहण्यास मदत होते.
रक्तामधील पीएच स्तर 7.35 ते 7.45 च्या मध्ये असणं गरजेचं असतं. जर शरीरातील पीएच स्थर कमी झाला तर अनेक शरीराच्या समस्यांचा सामना करावा लागतो. सतत थकवा जाणवणं, पोटाच्या समस्यांचा सामना करणं आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं यांसारख्या परिणामांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे शरीराला अनक आजार जडण्याची भिती असते. त्यामुळे शरीरातील पीएच लेव्हल योग्य प्रमाणात राखण्यासाठी अल्कलाईन डाएट फॉलो करणं गरजेचं असतं.
अल्कलाईन डाएटचे फायदे
अल्कलाईन डाएटचं काम शरीरातील पीएच लेव्हल योग्य प्रमाणात राखणं हे असतं. शरीरात जास्त आल्म पदार्थ झाल्यामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो. तसेच शरीरातील पेशींचं काम सुरळीत राहण्यासाठी शरीर डीटॉक्स करणंदेखील अत्यंत आवश्यक असतं. अल्कलाईन डाएट हेच काम करतं. याव्यतिरिक्त अल्कलाईन डाएट अॅन्टी-एजिंग प्रॉब्लेम्स दूर करण्यासोबतच पचनक्रिया मजबुत करण्याचेही काम करते.
तणावापासून दूर करतं अल्कलाईन डाएट
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस ताण-तणाव, प्रदुषण, आजार यांसारख्या समस्यांमुळे शरीरामध्ये अनेक बदल घडून येतात. अशातच आहारामध्ये काही अल्कलाईन पदार्थांचा समावेश केल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती आणि शरीरातील पीएच लेव्हल योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते. त्यामुळे शरीराचा अनेक आजारांपासून बचाव होतो.
वजन कमी करण्यासाठी अल्कलाईन डाएट
कॅन्सर आणि अर्थराइटिसचा धोक कमी करण्यासोबतच वजन कमी करण्यासाठीही मदत करत अल्कलाईन डाएट. दरम्यान अल्कलाईन डाएट बॉडीला क्लिंज करून आजारांपासून दूर ठेवतं.
जाणून घ्या, अल्कलाईन फुड्सबाबत
लिंबू
लिंबामध्ये निसर्गतःच अॅन्टी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. लिंबू खोकला, सर्दी, ताप आणि छातीत होणारी जळजळ यावर फायदेशीर ठरते.
लसूण
शरीराला आवश्यक असणाऱ्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने लसणाचं नाव घेतलं जातं. हृदयासाठी फायदेशीर असण्यासोबतच पीएच लेव्हल बॅलेन्स करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. याव्यतिरिक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, हाय ब्लडप्रेशर आणि लिव्हरच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
शिमला मिरची (Capsicum)
शिमला मिरचीचा समावेश क्षारयुक्त आहारामध्ये करण्यात येतो. यामध्ये असलेले एंजाइम्स आणि अॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील हानिकारक फ्री रेडिकल्ससोबत लढण्यास मदत करतात. एवढेच नाही तर ताण आणि डिफ्रेशनसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठीही मदत करते.
कंद-मूळं
अल्कलाईन डाएटमध्ये मूळा (पांढरा, लाल आणि काळा), बीट, गाजर यांसारख्या पदार्थांचं सेवन करा. 15 ते 20 मिनिटं वाफेवर शिजवल्यानंतर असचं सेवन करू शकता. यामुळे दिवसभर पोट भरल्याप्रमाणे वाटते आणि शरीराला आवश्यक तेवढी ऊर्जाही मिळते. त्याचबरोबर याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते.
ब्रोकली (Broccoli)
ब्रोकली, कोबी, फ्लॉवर आणि यांसारख्या इतर भाज्यांचा आहारात समावेश केल्यामुळे शरीरातील पीएच लेव्हल नियंत्रणात राहते. त्याचबरोबर याचे सेवन केल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासह कॅन्सरपासूनही बचाव होतो.
हिरव्या पालेभाज्या
कोबी, बीटाची भाजी, पालक इत्यादी भाज्यांचा समावेश होतो. यातील पालक सर्वात आरोग्यदायी भाज्यांपैकी एक आहे. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स आणि फोलेट अॅसिडचे मुबलक प्रमाणात असते. जे पोटाच्या समस्यांसोबतच शरीरातील पीएच लेव्हल बॅलन्स करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )