Health Tips : दिवाळीत फटाके फोडताय? लहान मुलांनी फटाके फोडताना 'अशी' घ्या काळजी
Health Tips : दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांनी होणाऱ्या बहुतेक दुखापतींचा डोळ्यांवर थेट परिणाम होतो. यामुळे या काळात डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
Health Tips : दिवाळीचा (Diwali 2022) सण सुरु झाला आहे. दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि भरभराटीचा सण. या निमित्ताने विविध प्रथांबरोबरच दिवे लावले जातात. फटाके फोडले जातात. फटाके फोडताना लहानांपासून ते मोठ्यांरपर्यंत सगळेच फटाके फोडण्याचा मनापासून आनंद घेतात. मात्र, हा अनंद घेत असतानाच आरोग्याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.
दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांनी होणाऱ्या बहुतेक दुखापतींचा डोळ्यांवर थेट परिणाम होतो. फटाक्यांमुळे डोळ्यांना गंभीर दुखापती होतात. दृष्टीला होणाऱ्या दुखापती दरवर्षी मोठ्या संख्येने नोंदवल्या जातात आणि त्या प्रामुख्याने फटाक्यांमुळे होतात. हात आणि बोटांबरोबरच डोळ्यांवर देखील फटाक्यांचा परिणाम होतो.
याच संदर्भात, प्राध्यापक डॉ. एस. नटराजन, प्रमुख, व्हायट्रो रेटिनल सेवा, डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल्स वर्ल्डवाइड आणि आदित्यज्योत आय हॉस्पिटल, मुंबईतील डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलचे युनिट यांनी दिवाळीच्या संदर्भात डोळ्यांची कशी काळजी घ्यायची यावर माहिती सांगितली आहे.
फटाक्यांचा धोका हा फक्त फटाके फोडणाऱ्या व्यक्तींनाच नसतो तर आसपास उभ्या असलेल्या तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांनाही तितकाच असतो. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
दुखापतीचा प्रकार
नेत्र दुखापतींची तीव्रता सौम्य चुरचुर आणि नेत्रपटलावर ओरखडा उमटण्यापासून रेटिनाला होणारे गुंतागुंतीचे आजार आणि अंधत्वाची शक्यता असलेल्या ओपन ग्लोब दुखापतीपर्यंत अशू शकते. फटाक्यांमध्ये मिसळलेल्या गन पावडरमधील रसायनांमुळेही डोळ्यांना दुखापती होतात. सातत्याने धूर येत राहिल्यामुळे डोळे चुरचुरतात आणि त्यातून पाणी येते. फटाक्यांतून येणाऱ्या धुरामुळे लॅरिंजायटिस आणि अन्य काही प्रकारचे प्रादुर्भाव घशामध्ये होतात. फटाके धोकादायक असतात, कारण, ते सोन्याचे ज्वलन करण्याइतपत उच्च तापमानावर (1,800° F) जातात. हे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमानाहून सुमारे 1,000 अंशांनी अधिक असते, या तापमानात काच वितळते आणि त्वचा तिसऱ्या स्तरापर्यंत (थर्ड डिग्री) भाजून निघू शकते. अशा प्रकारच्या दुखापती टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
बहुतेक फटाक्यांमध्ये गन पावडर असते, त्यामुळेच फटाक्यांचा स्फोट होतो. फटाक्यांचे स्फोट बेभरवशाचे असल्यामुळे अगदी काळजी घेऊन किंवा देखरेखीखाली फटाके उडवणाऱ्यांनाही दुखापती होऊ शकतात. दिवाळीच्या काळात प्रदूषणाचा स्तर कळस गाठतो, हवेतील नायट्रोज ऑक्साइड आणि सल्फर डायॉक्साइडची पातळी लक्षणीयरित्या वाढते.
डोळ्यांना होणाऱ्या प्रमुख दुखापती :
▪ ओपन ग्लोब दुखापत : ही आय वॉल अर्थात नेत्र भित्तिकेला होणारी ‘फुल थिकनेस’ दुखापत असते.
▪ क्लोज्ड ग्लोब दुखापत : ही नेत्र भित्तिकेच्या संपूर्ण जाडीला छेद न जाता/ती न फुटता झालेली दुखापत असते.
▪ जळजळ : डोळ्याभवती खरचटणे
▪ लॅमेलर लॅक्रिएशन : नेत्र भित्तिकेच्या जाडीवर अंशत: परिणाम करणारी जखम
▪ लॅक्रिएशन : टोकदार घटकामुळे नेत्र भित्तिकेच्या संपूर्ण जाडीला होणारी दुखापत
▪ पेनिट्रेटिंग (खोलवर) दुखापत : ही ‘एण्ट्रन्स वुंड’सह झालेली ओपन ग्लोब दुखापत असते.
▪ छिद्रित दुखापत : ही एण्ट्रस्ट आणि एग्झिट प्रकारच्या दुखापतींसह झालेली ओपन ग्लोब दुखापत असते.
'हे' टाळा :
- डोळे चोळू नका किंवा त्यावर ओरखडे येऊ देऊ नका.
- डोळे आणि चेहरा व्यवस्थित धुवा.
- डोळ्यांची चुरचुर होत असेल किंवा काही बाह्यघटक डोळ्यात गेला असेल, तर पापण्या पूर्ण उघडून धरा आणि डोळ्यांवर वारंवार पाण्याचे शिपके द्या.
- बाह्यघटक मोठा असेल किंवा डोळ्यात चिकटला असेल, तर तो काढण्याचा प्रयत्न करू नका.
- डोळे मिटलेले ठेवा आणि नेत्रविकारतज्ज्ञांकडे जा.
- डोळ्यात कोणतेही रसायन गेले असेल, तर तत्काळ डोळे व पापण्यांभवतीचा भाग पाण्याने ओला करा आणि 30 मिनिटे पाणी लावत राहा. तत्काळ नेत्रविकारतज्ज्ञांना दाखवा.
लहान मुलांनी 'अशी' घ्या काळजी :
- दुखापत झालेला डोळा चोळू नका. त्यामुळे रक्तस्राव वाढू शकतो किंवा दुखापत आणखी तीव्र होऊ शकते.
- दुखापतग्रस्त डोळ्यावर कोणताही दाब देऊ नका. अशा परिस्थितीत फोम कप किंवा ज्यूसच्या कार्टनचा तळ डोळ्यावर धरणे किंवा बांधणे या दोनच गोष्टी केल्या जाऊ शकतात.
- वेदनाशामकांसह कोणतीही ओटीसी औषधे देऊ नका.
- कोणतेही ऑइंटमेंट लावू नका. त्यामुळे डॉक्टरांना डोळा तपासणे आणि दुखापतीबाबत निदान करणे कठीण होऊन बसते.
- मुलांना मार्गदर्शन किंवा देखरेखीखालीही फटाक्यांशी खेळण्याची परवानगी देऊ नका.
सावधगिरी बाळगा :
- फटाके नेहमी मोकळ्या जागेत वाजवा, गॉगल्स घाला, स्वच्छ पाण्याने हात धुवा.
- लहान मुले फटाके वाजवत असताना मोठ्यांनी लक्ष द्यावे. कोणतीही दुखापत सहजपणे घेऊ नका; डॉक्टरांना दाखवा आणि प्रोफेशनल मदत घ्या.
- अपघाताने आग लागल्यास पाण्याने भरलेली बादली आणि वाळू लगेच सापडेल अशा ठिकाणी सज्ज ठेवा.
- फटाके सुरक्षित जागी बंद खोक्यात आणि लहान मुलांच्या हाताला लागणार नाहीत असे ठेवा.
- फटाके चेहरा, केस आणि कपड्यांपासून दूर ठेवा.
- फटाके वाजवताना कृत्रिम धाग्यांपासून (सिंथेटिक) तयार केलेले कपडे घालू नका.
- फटाके वाजवताना ते किमान हातभर लांब राहतील याची काळजी घ्या आणि फटाके वाजताना बघायला उभे राहताना किमान पाच मीटर्सचे अंतर ठेवा.
- फटाके वाजवण्यासाठी जाताना काँटॅक्ट लेन्सेस काढून ठेवा. त्याऐवजी चष्मा वापरा. चष्म्याने तुमच्या डोळ्यांचे संरक्षणही अधिक चांगल्या प्रकारे होईल.
- फटाक्यांची विल्हेवाट लावण्यापूर्वी ते पाण्याने भरलेल्या बादलीत घालून निष्क्रिय करा.
- जळलेले फटाके अपघाताने पायाखाली येऊन जखम होऊ नये म्हणून नेहमीच उत्तम पादत्राणे वापरा.
महत्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )