धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, अमरावती, भिवंडीतून तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
Amravati: राजापेठ पोलीस ठाण्यात या युवकाची NIAकडून कसून चौकशी करण्यात येत आहे .
Amravati अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे . अमरावती शहरातील छाया नगर परिसरातून एनआयच्या टीमने एका 27 वर्षे युवकाला रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे . राजापेठ पोलीस ठाण्यात या युवकाची NIAकडून कसून चौकशी करण्यात येत आहे .मिळालेल्या माहितीनुसार हा युवक पाकिस्तान मधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा समोर आलं आहे . NIA टीमने अमरावती शहरासह 17 ठिकाणी छापे टाकले असून अनेकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे . अमरावती शहरातील छाया नगर मधून NIA ने ताब्यात घेतलेल्या युवकाचं नाव मुसाईद असून त्याचं वय 27 वर्ष आहे..या युवकावर अमरावती शहरात 354 विनयभंगचा गुन्हा देखील दाखल आहे अशी माहिती मिळतेय..
अमरावतीचा तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात
अमरावती शहरातील छाया नगर परिसरातून NIA नेएका 27 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे . हा तरुण गेल्या सहा महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे . अनेक वेळा या तरुणाला पाकिस्तान मधून फोन आल्याचं प्राथमिक सूत्रांनी सांगितलं आहे . NIA ची टीम रात्री उशिरा अमरावती मध्ये दाखल झाली होती . अमरावती रात्रीतूनच या टीमने संशयित युवकाला ताब्यात घेतलं आहे . अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात या तरुणाला आणलं गेलं . या तरुणाची कसून चौकशी NIA चे अधिकारी करत असून या तरुणाच्या घरून काय काय ताब्यात घेतला आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही .NIA ने ताब्यात घेतलेल्या युवकाचं नाव मुसाईद असून त्याचं वय 27 वर्ष आहे. या युवकावर अमरावती शहरात 354 विनयभंगचा गुन्हा देखील दाखल आहे अशी माहिती मिळतेय..
NIA कडून 17 ठिकाणी छापे
अमरावती शहरासह NIA ने 17 ठिकाणी छापे मारले आहेत . यातून अनेकांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे . पाकिस्तानी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून एका 35 वर्षीय तरुणाला NIA च्या टीमने ताब्यात घेतलं आहे . रात्रीतून या तरुणाला ताब्यात घेतला असून NIA कोणा कोणाला ताब्यात घेणार आहे , या तरुणाचे संबंध नक्की कुणाशी होते ? याकडे सर्वांचे लक्ष आहे .
भिवंडीत NIA चे छापे
भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ची कारवाई. पहाटेच्या सुमारास आलेल्या पथकाने एकास घेतले ताब्यात आहे. कामरान अन्सारी 45 असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. पाकिस्तानमध्ये देशविरोधी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय असल्यानं ही कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरात NIA चीही तिसरी कारवाई आहे.