Gold Silver Rate : लोकल ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात तेजी, गुंतवणुकीची चांगली संधी...
Gold Silver Rate : कमोडिटी बाजारात आज सोने स्वस्त दरात मिळत आहे. तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टीनं देखील याकडे पाहू शकता.

मुंबई : सोन्याचे दर काही दिवसांपासून वाढत असल्याचं पाहायला मिळतं होतं. स्थानिक सर्राफा बाजारात सोन्याचे दर 80 हजारांच्या जवळ जाताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आज कमोडिटी बाजारात सोन्याचे दर कमी झाल्याचं पाहायला मिळालं. गुंतवणूक म्हणून या पर्यायाच विचार करण्याची गुंतवणूकदारांना संधी आहे.
MCX वर सोने कितीवर ?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 78875 रुपये होता. म्हणजेच कालच्या तुलनेत सोने दरात 127 रुपयांची घसरण झाली. सोन्याचा हा दर फेब्रुवारी कॉन्ट्रॅक्टसाठी पाहायला मिळाला. आज सोन्याचा किमान दर 78755 रुपयांपर्यंत घसरला होता. स्थानिक बाजारात 10 ग्रॅम सोनं 79620 रुपयांच्या दरानं विकलं जात आहे. कमोडिटी मार्केटमध्ये स्वस्तात सोने खरेदीची संधी उपलब्ध आहे.
MCX वर चांदीचा दर किती?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा आजचा दर 96000 रुपयांच्या जवळ पोहोचला होता. चांदीचा एक किलोचा दर 95930 रुपये पाहायला मिळाला. चांदीच्या दरात 128 रुपयांची वाढ झाली. चांदीची आजची किमान किंमत 95625 रुपये होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत किती?
कॉमेक्सवर सोन्याचे फेब्रुवारी फ्यूचर्सचे दर 2749.61 डॉलर प्रति औस वर आहेत. यामध्ये 7.34 डॉलर्सची घसरण पाहायला मिळू शकते. आज हे दर 2743.9 डॉलर्स प्रति औस पर्यंत कमी झाले होते. चांदी 33.025 डॉलर प्रति औसच्या दरानं मिळत आहे. जागतिक बाजारात सोने दरात घसरण पाहायला मिळाली तर चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली.
सीरिया आणि तुर्की यांच्यातील वाढत्या तणावाच्या आणि जागतिक राजकारणातील संघर्षाच्या कारणामुळं गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. त्यामुळं सोने दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. सोन्यातील गुंतवणूक वाढवायची असल्यास गुंतवणूकदारांनी कमोडिटी बाजारावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असते.
इतर बातम्या :
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
