एक्स्प्लोर

Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं

Ajit Pawar Meets Sharad Pawar : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी त्यांची दिल्लीत भेट घेतली आहे. यानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने मोठं वक्तव्य केलंय.

Sharad Pawar & Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Birthday) यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. त्यातच आता शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले (Hemant Takle) यांनी केले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांसोबत 40 आमदार गेल्याने राष्ट्रवादी मोठी बंडखोरी झाली. यानंतर शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हिरावलं गेलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबीय पहिल्यांदा आमने-सामने आल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना मोठा फटका बसला. यानंतर शरद पवार-अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्यातच आज अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा देखील झाली. 

शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं

अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, मधल्या काळात त्यांच्या फायद्यासाठी सगळे शरद पवार यांना सोडून गेले. तरी शरद पवार मागे हटले नाहीत. त्यांनी दुःख दाबून ठेवले आणि लोकांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. संविधान वाचवायचे असेल, न्याय व्यवस्था टिकवायची असेल तर शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी एकत्र यायला हवे, असे हेमंत टकले यांनी म्हटले आहे. आता काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार का? शरद पवार त्यांची राजकीय भूमिका बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शरद पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले अजित पवार? 

दरम्यान, अजित पवार यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलंय की, आज साहेबांचा वाढदिवस आहे. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्या दोघांचे दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो. आम्ही त्यांचे दर्शन घेतले, चहा-पाणी झाले. सर्वसाधारण गोष्टींवर आमच्या चर्चा झाल्या. आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आमचं अधिवेशन कधी आहे? अशा चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. 

आणखी वाचा 

Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar meet Sharad Pawar : भेटीत काय चर्चा झाली ? अजित पवारांनी सगळंच सांगितलंSharad Pawar Birthday :शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते नवी दिल्लीतील निवासस्थानी उपस्थितParbhani Todfod : परभणीतील गाडी तोडफोडीचा धक्कादायक व्हिडीओ समोरKurla Bus Accident Video : निर्लज्जपणाचा कळस, कुर्ला अपघातातील मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
Ajit Pawar meets Sharad Pawar : शरद पवारांना भेटून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शरद पवारांना भेटून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget