Devendra Fadnavis meet PM Narendra Modi : देवेंद्र फडणवीसांनी घेतली मोदींची भेट
Devendra Fadnavis meet PM Narendra Modi : देवेंद्र फडणवीसांनी घेतली मोदींची भेट
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भांत (Kalyan Durgadi Fort) कल्याण न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला आहे. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? या संदर्भात निर्णय देत 48 वर्षांपासून सुरू असलेला खटाला मार्गी काढला आहे. यात मुस्लिम पक्षाचा दावा कल्याण न्यायालयाने फेटाळला आहे. मुस्लिम पक्षाच्या वतीने सर्फउद्दिन कर्ते यांनी दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यात द्या, अशी मागाणी केली होती. 1976 पासून कल्याण न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु होती. दरम्यान 48 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कोर्टाने शासनाच्या बाजूने निकाल दिला आहे. परिणामी कल्याणमध्ये शिवसेना कार्यकर्ते आणि हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरती करत उत्साह साजरा केला आहे. मात्र 1976 पासून सुरू असलेले हे प्रकरण नेमकं काय याबाबत माहिती सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
1976 साली माजलीसे मुशावरा ट्रस्ट या मुस्लिम संघटनेने दुर्गाडी किल्ल्याची मालकी हक्क मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. तसेच सरकारकडून मालकी मिळावी यासाठी कोर्टात पुरावा दाखल करण्यात आला होता. 1994 साली निशाणी 130 आणि 137 वर कोर्टाने हुकूम केला आहे. महाराष्ट्र शासनाने दुर्गाडी किल्ल्याची दुरुस्ती पीडब्ल्यूडी मार्फत करावी. तसेच त्याचा अहवाल सादर करावा, त्या अनुषंगाने ही जागा शासनाच्या मालकीची आहे. त्या जागेवर कोणालाही हक्क सांगता येणार नाही, असे शासनाच्या कागदपत्राच्या आधारावर शासनाने बाजू मांडली आहे. या दाव्याच्या कामी 1966 साली शासनाने या जागेचा ताबा घेतला होता.
तत्कालीन कल्याण नगरपरिषदेला ती जागा दिली होती. कल्याण महापालिकेने ती जागा ताब्यात घेऊन वेगवेगळे कार्यक्रम घ्यावे,असा हुकूम कोर्टाने केला होता. मात्र मनपाने अंबालबजावणी न केल्यामुळे ती जागा पुन्हा शासनाने ताब्यात घेतली असल्याची माहिती सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे.