Suresh Dhas On Massajog Crime: या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
Suresh Dhas On Massajog Crime: लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या प्रकरणाचे निपक्षपाती पण हे चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत.
Suresh Dhas on Massajog Crime:बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण करून खून करण्यात आल्याची भीषण घटना घडली असून या घटनेमुळे केवळ केज तालुकाच नाही तर जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जातोय. या गुन्हेगारांच्या पाठीमागे जे कोणी अका असतील त्यांना त्यांच्या आकांनी वेळी सावध करावं. तरुण मुले ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहेत त्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे असं आमदार सुरेश धस म्हणालेत. मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी भाजपाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे आज मस्साजोग मध्ये पोहोचले होते.
लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या प्रकरणाचे निपक्षपाती पण हे चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. अपहरण झाल्यानंतर तीन तास गुन्हा नोंद का झाला नाही ? यामध्ये जे कोणी पोलीस दोषी असतील त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी सुरेश धस यांनी केली आहे.
नक्की प्रकरण काय?
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून खून झाल्याची घटना समोर समोर आली आहे. त्यांचा मृतदेह केज परिसरात आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनं सरपंच आणि त्यांचा भाऊ धारूरहून केजच्या दिशेने जात असताना अनोळखी इसमांनी गाडी आडवी लावून सरपंचांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांना प्रकरणात सापडले महत्वाचे धागेदोरे
पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी एकूण आठ आरोपींपैकी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अजूनही काही आरोपी फरार आहेत. मात्र, पोलिसांनी देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतली आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ पोलीस आणि आता हस्तगत केलेली आहे. ज्या स्कॉर्पिओमधून संतोष देशमुख यांचा अपहरण करण्यात आलं होतं. या अपहरणानंतर संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर सर्व आरोपी हे फरार झाले होते. आरोपी असलेल्या प्रतीक घुले याला देखील बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. पुण्यामधून घुले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बजरंग सोनावणेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट
मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांनी पवनचक्की प्रकरणात खंडणीला विरोध केला म्हणून अपहरण करून हत्या केली. संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्याचे कळताच मी जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांना सलग फोन केले. मॅसेजेस केले परंतु संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला. पोलीस अधिक्षक यांचा संपर्क होऊ शकला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. यामुळे पोलीस अधिक्षकांच्या भुमिकेबाबत संशय निर्माण होत आहे. बीड जिल्हा पोलीसांकडून खोट्या केसेस करणे आणि खऱ्या अपराधाकडे दुर्लक्ष करणे सर्रासचे झाले आहे. यामुळे कायद्याची अमलबजावणी होणे अशक्य झाले आहे
हेही वाचा: