Health Tips : सावधान! कोरोना पुन्हा डोकावतोय; 'या' 4 योगासनांनी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करा
Health Tips : शरीरात आधीच असलेल्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी योग खूप प्रभावी आहे.
Health Tips : कोरोना (Covid-19) विषाणूचा पुन्हा एकदा प्रसार सुरू झाला असून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चिंतेची बाब म्हणजे Covid JN.1 चे नवीन प्रकार देखील समोर आले आहेत. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी, केवळ कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक नाही तर तुमची प्रतिकारशक्ती देखील मजबूत असणं गरजेचं आहे. चांगल्या आहाराबरोबरच नियमितपणे काही योगासने करून रोगप्रतिकारशक्ती मजबूत करता येते.
शरीरात आधीच असलेल्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी योग खूप प्रभावी आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये निरोगी राहण्यासाठी दररोज काही मिनिटे योगासने करा. अशाच काही योगासनांविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात जे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
वृक्षासन
वृक्षासन या आसनाला इंग्रजीत 'ट्री पोज' म्हणतात. हे आसन अगदी सोपं आहे. हे योग आसन करण्यासाठी योगा चटईवर सरळ उभे राहून उजव्या पायाचा गुडघा वाकवून डाव्या पायाच्या मांडीवर स्वत:ला झुकवा. आणि हात वरच्या दिशेने घेऊन नमस्कार करा. आता शरीर संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा.
वृक्षासनाचे फायदे
हे आसन केल्याने मणक्याची लवचिकता वाढते आणि घोटे आणि गुडघे यांचे स्नायूही मजबूत होतात. या साध्या आणि सोप्या आसनाचे पालन केल्याने एकाग्रता सुधारते आणि तणावापासूनही आराम मिळतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे आसन उत्कृष्ट आहे.
त्रिकोनासन कसे कराल?
हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी चटईवर सरळ उभे राहा आणि नंतर दोन्ही पायांमध्ये साधारण 4 फूट अंतर ठेवा. आता हळूहळू श्वास घ्या आणि उजवा हात डोक्याच्या वरच्या बाजूला हलवा. श्वास सोडताना शरीर डावीकडे वाकवा. काही सेकंद या आसनात राहा. साधारण दोन ते तीन वेळा तुम्ही हे आसन पुन्हा पुन्हा करू शकता.
त्रिकोनासनाचे फायदे
या योगासनाचा तुम्ही काही काळ नियमित सराव केल्यास तुमची फुफ्फुसे मजबूत होतात. याबरोबरच हे आसन पचन आणि चयापचय वाढवते. स्नायूंची ताकद वाढवण्याबरोबरच ते लवचिकही बनवतात.
भुजंगासन कसे करावे?
भुजंगासन करण्यासाठी एका चटईवर पोटावर झोपा आणि दोन्ही हात समोरच्या बाजूला पसरवा. आता हातांना खांद्याच्या रेषेत परत आणा आणि डोक्यापासून छातीपर्यंतचा भाग वरच्या बाजूला घ्या.
भुजंगासन-कोब्रा पोजचे फायदे
हे आसन केल्याने खांदे, पाठीचा कणा आणि छातीचे स्नायू मजबूत आणि लवचिक होतात. फुफ्फुस मजबूत करण्यासाठी हे आसन खूप प्रभावी मानले जाते.
प्राणायाम करा
जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर त्यासाठी रोज काही मिनिटे प्राणायाम करण्याची सवय लावा. यामुळे इतर अनेक आजारांबरोबरच श्वसनाच्या समस्यांपासूनही तुमचे रक्षण होईल. कपालभाती, अनुलोम-विलोम, भस्त्रिका आणि नाडीशोधन प्राणायाम रोज 20 ते 25 मिनिटं तुम्ही करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : हिवाळ्यात कधी आणि किती वेळ चालणे फायदेशीर ठरू शकते? यावेळी चालणे टाळा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )