(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : हिवाळ्यात कधी आणि किती वेळ चालणे फायदेशीर ठरू शकते? 'या' वेळी चालणे टाळा
Health Tips : चालणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामुळे चयापचय वाढतो, हृदय आणि मेंदूचे आरोग्यही निरोगी राहते. शरीर उबदार ठेवण्यासोबतच वजनही नियंत्रित राहते. याशिवाय चालण्याचे अनेक फायदे आहेत.
Health Tips : सकाळी आणि संध्याकाळी चालणे आरोग्यासाठी (Health Tips) फायदेशीर आहे. याचे एकच नाही तर अनेक फायदे आहेत. दैनंदिन जीवनात (Lifestyle) बरेच लोक चालायला (Walk) बाहेर पडतात पण हिवाळा (Winter Season) येताच ते फिरायला जाणे टाळतात. काहींना सकाळी उठताना त्रास होतो तर काहींना आळसामुळे अंथरूणातून उठावेसे वाटत नाही. पण हिवाळ्यात खरंच बाहेर वॉक करायला जावं का? याचं उत्तर 'हो' असं आहे. तर, चला जाणून घेऊयात किती वेळ चालणे फायदेशीर ठरू शकते.
चालण्याचे फायदे
चालणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामुळे चयापचय वाढतो, हृदय आणि मेंदूचे आरोग्यही निरोगी राहते. शरीर उबदार ठेवण्याबरोबरच वजनही नियंत्रित राहते. याशिवाय चालण्याचे अनेक फायदे आहेत.
हिवाळ्यात चालायला जाण्यााधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
- योग्य कपडे घालूनच फिरायला जा.
- शरीर पूर्णपणे झाकल्यानंतरच घराबाहेर पडा.
- फक्त उबदार कपड्यांना प्राधान्य द्या.
- वेगाने चालणे किंवा धावणे लगेच सुरू करू नका.
- घरातून बाहेर पडल्यानंतर हळू चालायला सुरुवात करा आणि नंतर चालण्याचा वेग वाढवा.
- थंडीमुळे सकाळी उठण्यात अडचण येत असेल तर तुम्ही सकाळी 8.30 ते 9.30 किंवा संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत फिरायला जाऊ शकता. यावेळी सर्दी होण्याचा धोका कमी असतो.
- जर तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या, दमा किंवा न्यूमोनिया असेल तर सकाळी फिरायला जाणे टाळा.
- वृद्धांनी हिवाळ्यात फिरायला जाणे टाळावे.
हिवाळ्यात किती वेळ चालावे?
तज्ञांच्या मते, दररोज किमान 10,000 पावलं तरी चालणं आवश्यक आहे. कारण ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, व्यस्त जीवनशैलीमुळे दैनंदिन जीवनात सर्वांना हे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, हिवाळ्यात आठवड्यातून किमान पाच दिवस अर्धा तास फिरायला जावे. त्यामुळे अनेक आजारांपासून तुमच्या आरोग्याचे रक्षण करता येते. तसेच, रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. सकाळची हवा घेतल्याने पूर्ण दिवस तुमचा मूडही फ्रेश राहतो. तसेच, शरीरात सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सकाळी आनंदी आणि उत्साही राहायचं असेल तर हिवाळ्यात नक्की चालायला जा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.