Health Tips : उच्च रक्तदाब आणि मधुमेहग्रस्त 40% पुरुष घेतायत उपचार
Health Tips : 35-40 वयोगटातील 40% पुरुष प्रजनन उपचारांचा पर्याय निवडतात ज्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या समस्या आहेत.
पुणे : सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे आणि कामाच्या वाढत्या ताणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. यामधलाच आजार म्हणजे उच्च रक्तदाब (High BP) आणि मधुमेह (Diabetes). पुरुषांमधील रक्तातील साखरेची उच्च पातळी आणि उच्च रक्तदाब या दोघांचा शुक्राणू निर्मितीवर परिणाम होऊन हार्मोनल संतुलन बिघडू शकते. पुरुषांनी त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे.
लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपानासारखी व्यसने, मानसिक तणाव, लॅपटॉपचा अतिरिक्त वापर, घट्ट कपडे घालणे या गोष्टी पुरुष वंध्यत्वाशी संबंधित दोष निर्माण करायला कारणीभूत ठरू शकतात. काही औषधांच्या दुष्परिणामांमुळेही पुरुषांना वंध्यत्वासारख्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
पुण्यातील खराडी येथे राहणारे रूग्ण नितीन देसाई (नाव बदलले आहे)* हे इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) उपचार घेत असून गेल्या 4 वर्षांपासून उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर औषधोपचार करत होते. शुक्राणूंची संख्या खालावल्याने त्यांना प्रजनन समस्यांचा सामना करावा लागला. वंध्यत्व ही एक अशी समस्या आहे जी स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही दिसून येते. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार पुरुषांमधील रक्तातील उच्च साखरेची पातळी आणि प्रजनन समस्या यांच्यात परस्परसंबंध आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या पुरुषांना वंध्यत्व उपचारासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
35-40 वयोगटातील 40% पुरुष प्रजनन उपचारांचा पर्याय निवडतात ज्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या समस्या आहेत. उच्च रक्तदाब आणि साखरेची असामान्य पातळी शुक्राणूंच्या डीएनएवर परिणाम करते आणि ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे हालचाल कमी करते. शुक्राणुंची गुणवत्ता किंवा शुक्राणुंची संख्या कमी असली तरी इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) आणि इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) द्वारे तज्ज्ञ निरोगी शुक्राणूंची निवड करणे शक्य होते. संपूर्ण आरोग्य तसेच प्रजनन आरोग्याची काळजी घेण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली राखणे आवश्यक आहे. नियमित तपासणी करून रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे आवश्यक असल्याचे डॉ निशा पानसरे(वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, पुणे )यांनी स्पष्ट केले.
रक्तातील साखरेची असामान्य पातळी शुक्राणूंच्या गतिशीलतेवर परिणाम करते आणि शुक्राणूंच्या पेशींमधील डीएनए नष्ट करते. अनियंत्रित रक्तदाब देखील शुक्राणूंची संख्या कमी करत असल्याचे दिसून आले आहे. आहार, व्यायाम आणि आवश्यक असल्यास औषधोपचाराद्वारे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे फायदेशीर ठरते तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवून प्रजनन उपचारांचा यश दर वाढविता येत असल्याचे डॉ पायल नारंग( प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, लुल्लानगर) यांनी स्पष्ट केले.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )