Sunil Raut on Vidhan Sabha : घरी वेळ दिला,थोडा आराम केला...मतदानानंतर सुनील राऊत निवांत!
Sunil Raut on Vidhan Sabha : घरी वेळ दिला,थोडा आराम केला...मतदानानंतर सुनील राऊत निवांत!
हे ही वाचा...
राज्यातील 288 विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या मतदानानंतर अनेक एक्झिट पोलमधून राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तर, काही सर्वेक्षणातून महाविकास आघाडीलाही बहुमताचा आकडा गाठता येईल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणूक एक्झिट पोलमधील आकडेवारी पाहिल्यास राज्यात अत्यंत चुरशीचा सामना होत असून अपक्ष व इतरांकडे सत्तेच्या चाव्या जाण्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री पदासाठी चांगलीच स्पर्धा पाहायला मिळत आहे. राज्यात मी पुन्हा येईन म्हणत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सरकार पुन्हा स्थापन केलं. मात्र, मुख्यमंत्रीपदाची (Chief minister) माळ त्यांच्या गळ्यात पडली नाही. याउलट, शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्याने राज्यातील राजकीय गणतिचं वेगळी पाहायला मिळालं. त्यामुळे, 2024 च्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. Axis My India या संस्थेच्या Exit Poll नुसार राज्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती असल्याचे म्हटले आहे.
एक्सिस माय इंडिया या संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या एक्झिट पोलमधून राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, राज्यातील 288 जागांपैकी महायुतीला 178-200 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला 288 पैकी केवळ 82-102 जागा मिळतील, असा अंदाज आहे. महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई वगळता इतर ठिकाणी फार यश मिळत नसल्याचा अंदाज एक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. इतरांना 6-12 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच संस्थेकडून राज्यातील मुख्यमंत्रीपदासाठीही जनमत घेण्यात आले आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सर्वाधिक पसंती आहे. एकनाथ शिंदे यांना 31 टक्के लोकांची पसंती दिसून येते.
![ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/19/4dfca325faa2cad9c59e79a8a09b287517372950949421000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/19/89530b6babe56aa47c7acc7f5c9c1e3a17372909928941000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोध](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/19/0a67b66a00779b01cfd928a9a959dc3417372889943921000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Hasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/19/f1b889dbf0593945db9f85f40b90be1e17372881330441000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/19/947fa13e6794343215feecee45e3ce7b17372872391701000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)