Health News : चहात दुध घालून पिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! रिकाम्या पोटी पित असाल धोक्याची घंटा, जाणून घ्या याचे तोटे
Health News : दुधाच्या चहाशी संबंधित एक गोष्ट आहे, जी प्रत्येकाला माहित असली पाहिजे, ती म्हणजे रिकाम्या पोटी दुधासोबत चहा पिण्याचे तोटे.
Health News : तुम्हालाही दुधाचा चहा (Tea) आवडतो का? चहात दुध घालून पिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दुधाची चहा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पित असाल तर तुमच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. अनेकांचं असं मत आहे की, सकाळची सुरुवात एक कप गरम चहाने केली तर दिवसभर ताजेतवाने वाटते. पण चहाशी संबंधित एक गोष्ट आहे जी प्रत्येकाला माहित असली पाहिजे, ती म्हणजे रिकाम्या पोटी दुधासोबत चहा पिण्याचे तोटे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. जाणून घ्या
दुधाच्या चहाचे तोटे
पोट फुगणे
जास्त दूध असलेला चहा पिताय? आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा चहा प्यायल्याने पोट फुगते. चहामध्ये कॅफिन असते, जे पोटासाठी चांगले नाही. या पेयात दूध घातल्यास आम्लता वाढते.
बद्धकोष्ठता होणे
चहामध्ये कॅफिनशिवाय थिओफिलिन देखील असते. जास्त चहा पिल्याने शरीर निर्जलीकरण होते, ज्यामुळे गंभीर बद्धकोष्ठता निर्माण होऊ शकते.
ताणतणाव
जर तुम्ही सतत चिंतेने त्रस्त असाल तर वारंवार चहा पिणे बंद करा. असं म्हणतात की, हा चहा घेतल्याने अजून त्रास वाढतो. यामुळे भविष्यात तुम्हाला गंभीर स्वरुपाचा त्रास होऊ शकतो.
निद्रानाशची समस्या
चहामध्ये कॅफीन असते, जी तुमची झोपेत व्यत्यय आणू शकते आणि निद्रानाश होऊ शकते. त्यामुळे आधीच निद्रानाश लक्षणांनी त्रस्त असताना दुधाचा चहा पिणे टाळा.
उच्च रक्तदाब
जास्त दूध असलेल्या चहामुळे रक्तदाबात असंतुलन निर्माण होऊ शकते. त्यामुळे आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीने दुधासोबत चहा जास्त प्रमाणात घेऊ नये.
डिहायड्रेशन
जास्त दूध असलेल्या चहामुळे डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते, म्हणून दूध आणि साखर मिसळलेला चहा जास्त पिणे टाळावे.
रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिऊ नका
शक्य असल्यास, सकाळी लवकर रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिऊ नये. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी काही फायदा होईल.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Weight Loss : झटपट वजन कसं कमी करू? लठ्ठपणाचा शत्रू आहे हे 'वेट लॉस ड्रिंक' पोटाची चरबी वितळलीच म्हणून समजा!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )